Skip to main content

प्रकटन

प्रकटन — मिसळपाव सदस्यांची मते, निवेदने आणि प्रकट विचार यांचा विभाग. सामाजिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन विषयांवरील मराठी लेखन येथे वाचा.

ईश्वर!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 01/07/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.

मी माझ्या अनंत पसार्‍यात मी एकटाच बसलोय!
नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!!
राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय......
तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं.....
पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........
पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक....
त्याची किती निगराणी केली होती मी.....
किती जोपासना केली.......
वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........
अनेक आजारांतून त्याला वाचवला........
आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला....
मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........

पडक्या घरास माझ्या

लेखक suralesandip यांनी सोमवार, 30/06/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.

या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?

हरवले सूर माझे... सांजवेळी तरीही
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?

होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?

आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?

--शब्द्सखा!

परतुनी येईन मी....

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 29/06/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.

परतुनी येईन मी....

जीवनाचे युद्ध चालू, कालपुरुषा जिंकण्या
लागली माघार घ्यावी शस्त्र माझे टाकुनी
दैव जरिही रुष्टले, आशा दिली ना सोडुनी
परतुनी येईन मी उरली लढाई खेळण्या ॥१॥

कर्म माझ्या वाटचे, झाले न माझ्या हातुनी
रंगुनी स्वप्नात पुढच्या, आज गमवुन बैसलो
मार्ग माझा उजळण्याची वाट पाहत राहिलो
भाग्य की, झालो शहाणा ठेच एकच लागुनी ॥२॥

अपयशाचा डंख जाणिव देत राही आतुनी
आतल्या ज्वालामुखीची आग पेटवणार मी
शस्त्र जरि गेले तरीही सोडले ना धैर्य मी
जिंकण्या येईन मी ब्रम्हास्त्र सोबत घेऊनी ॥३॥

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 27/06/2008 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली. वेळोवेळी हशा आणि टाळ्या यांच्या गजराने प्रेक्षकांनी त्यांची पसंती जाहीर केली.

'राजकन्येची बाहुली' : एक दृष्टीक्षेप

तो आणि त्याचा 'मी'

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 26/06/2008 14:10 या दिवशी प्रकाशित केले.


देवाजवळ जाताना
'मी'पणा सोडावा म्हणतात
तसाच गेलोही. पण !
मला भेटला मुर्तिमंत अहंकार
मुर्तिजवळ असण्याचा.
मोठ्या कष्टाने मन सावरले
प्रकटणाय्रा 'मी'पणाला आवरले
मनोमन खात्री पटली
तीव्रतर खंतही वाटली
त्या गाभाय्रात देवच नव्हता !
होता फक्त एक --
अहंकार
आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरलेला
देवालाही
आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा
आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा
तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!



जिवलगा...

लेखक फटू यांनी मंगळवार, 24/06/2008 07:40 या दिवशी प्रकाशित केले.

व्हायचं ते तसं होऊन गेलं आहे
फक्त आठवणी उरल्यात आता
कालचा दिवस केव्हाच संपला
आलीस सोडून तू काटेरी वाटा

समजायचं तसं ते एक वादळ होतं
आयुष्याला फिरवून ते निघून गेलं
किती खंबीर आहेस तू मनाने हेच
जाता जाता त्यानं जाणवून दिलं

वेदनांमधून सार्‍या बाहेर पड आता
एक छान हसरं आयुष्य दिसेल तुला
पुन्हा एकदा भर मनात उत्साह जरा
दिसेल जागोजागी प्राजक्त फुललेला

तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?

(दिवस असे हे ढकलायचे __)

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 23/06/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.

(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!)

चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !!
---------------------------------------------------------------------------

दिवस असे हे ढकलायचे!
रडत रखडत जगायचे !!

ऑफिसला रोज जाणे !
करता रोजची कामे !
बॉसला पुरुन उरायचे !!

जळणे शेजार्‍या वर!
सोसेना कलिगचे काम
घरातले प्रोब्लेम सोडायचे !!

होता पहाट वेळी!
उरकावी कामांची यादी !!
मनात उत्साह भरायचे !!