असेही एक पैलतीर (भाग तीन)
पहिला भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1865
दुसरा भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1868
सामाजिक मालिका --- काही आराखडे
टी व्ही ऑल टाईम
सिरीयल्स प्रोड्युसिंग कोर्सवेअर डिसेंबर २००८
वाढता वाढता वाढे
सामाजिक सिरीयल्स म्हणजे टी व्ही ऒलटाइमची ब्रेड बटर उत्पादने आहेत. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त एपिसोड्स करुन सिरीयलवर जाहिरातीचे उत्पन्न वाढवता येते.
ह्याचे उत्तम तंत्र टी व्ही ऒलटाइमने साधले आहे. ह्यालाच काही टवाळ लोक पाणी घालून वाढवण्याचे तंत्र असेही म्हणतात. टवाळकीचा भाग सोडला तर हे तंत्र प्रोड्युसरसाठी जीवन (पाणी) आहे ह्यात शंका नाही. ह्या तंत्राचे काही दाखले पुढे दिले आहेत.
- पुर्वी झालेलेच प्रसंग आठवणीच्या नावाखाली पुन्हा पुन्हा दाखवणे. ह्यासाठी सेपिया फ़टॊग्राफ़ी वापरून तपकिरी रंगात तीच ती द्रष्ये रिपीट करावीत.
- काहीही कारण न देता पुर्वीचे प्रसंग दाखवणे. ज्या प्रेक्षकंचे पुर्वीचे एपिसोड्स मिस झाले असतात, त्य़ांना मिस झालेले भाग पुन्हा पहायला मिळतात.
- गाणी टाकून गाण्यांमधे पुर्वीचे प्रसंग दाखवणे. गाणी चित्रीकरणाचा खर्चही वाचतो. सिरीयलचे फ़ुटेज वाढतेच.
- एकदा मारलेली झापड एकामागून एक तीनदा दाखवावी. त्यावेळी पात्राच्या चेहरा फ़ेड इन फ़ेड आउट करावा. किंवा भसाभसा लाइटची उघडझाप किंवा ढणाढण म्युझीक वगैरे तंत्रे वापरली म्हणजे सिरीयल लांबते. शिवाय पात्राला कुशल अभिनय करायची गरज रहात नाही.
- एकच प्रसंग तीनदा दाखवणे. हा तीन पात्रांच्या द्रष्टीतून दाखवला जातो. फ़ुटेज वाढतेच आणखी दिग्दर्शक कसा विविध ऎन्गल्सने सिचुएशन कवर करतोय म्हणून प्रेक्षक खुष होतात.
- तुकड्या तुकड्याने गाणी पेरावीत. वेगळ्या गाण्यांवर खर्च न करता, तेच गाणे पुन्हा पुन्हा वाजवावे. पात्र गात असतांना जुने प्रसंग रिपीट दाखवायला विसरू नये. पहा- "आप कहना क्य़ा चाहते है" मधले तुम्हारी अदा.... हे गाणे. तीनशे एपिसोडम्धे हे गाणे नउशे साठ वेळा वाजवले. म्हणजे गाण्याचा वेळ एकत्रीत केला तर ३०० पैकी ९६ एपिसोड ह्या गाण्यावर धकले. "वाढता वाढता वाढे" तंत्र वापरून केलेला हा एक जागतीक विक्रम आहे.
- दुसरा एपिसोड सुरू होतांना आधीच्या एपिसोड्च्या शेवटाचे तीन मिनीट पुन्हा दाखवायचे. वीस मिनटाच्या एपिसोड मधे १५% फ़ुटेज फ़ुकटात वाढते.
- पात्र विचार करते आहे, आठवण काढते आहे, रागावले आहे, झोपाळले आहे अशा विविध माइलस्टोनच्या बॆकग्राउंडवर काहीही विषेश न होउ देता केवळ म्युझीक व पात्राचे चार पाच क्लोज अप ह्यावर चार पाच मिनटे (२०%) फ़ुटेज वाढवायचे.
- मेलेल्या पात्राचा पुनर्जन्म दाखवला की जुने फ़ुटेज रीपीट करण्याचे खुल्ले लायसंन्स मिळते. नो क्वेश्चन्स आस्कड!
- ब्रेकच्या आधी नायीका नायकाला थप्पड मारते. ढणाढण बॆकग्राउंड म्युझीक सोबत ही थप्पड तीनदा दाखवल्यानंतर... ब्रेक.
- धावत्या कारसमोर लहान मूल येते.... ब्रेक.
- बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.)
- रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.)
- खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना....")
वाचने
5685
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
खरं आहे तुमचं...
अजुन एक गोष्ट...
झकास निरिक्षण..
सही!!!!!!!!!!!
यक्कू.
In reply to यक्कू. by विजुभाऊ
decode please
यक्कु पिताजी :)