मौनाला फुटली वाणी!..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मौनाला फुटली वाणी!..
.
एक ना स्फुरला शब्द..
एक ना ओळ सुचली..
हसले रडले ओठांनी..!
एक ना कविता रचली.
शब्द पाखरे भवताली,
सुर गुंफून भिरभिरली..
तार तार झंकारुनी...
कंपने कंपनांत विरली..!!!
अनाहतसा नाद छेडूनी..
मौनाला फुटली वाणी!..
अगम्य अशा बोलांची..
नकळत जुळली गाणी..!!!
हसले रडले ओठांनी...
नकळत जुळली गाणी..!!!
==================
स्वाती फडणीस....... १७-०८-२००८
वाचने
1800
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
हसले रडले
अप्रतिम
आभार..