मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात्ररंग..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात्ररंग.. चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले (क्षेम : मिठी, अंकी : मांडीवर) - प्राजु

वाचने 3911 वाचनखूण प्रतिक्रिया 17

मदनबाण 23/11/2008 - 10:01
रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले मस्त... :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

मनिष 23/11/2008 - 10:05
आणि "धुंद होते शब्द सारे" च्या चालीवर म्हणता पण येते. सुरेख कविता प्राजु!

जयवी 23/11/2008 - 12:29
प्राजु....ऐकतच नाहियेस अगदी.... एकदम सुसाट निघालीयेस :) डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले ......... क्या बात है !! अख्खीच्या अख्खी आवडली..... अप्रतिम !!

आपला अभिजित 23/11/2008 - 15:42
कवितेचं गाणं झाल्याखेरीज आपल्याला त्यातलं घंटा काही कळत नाही. तरीपण कविता गेय वाटली. छान आहे. तू एखादा संग्रह का काढत नाहीस प्राजु? (अवांतर : बंदुकीतलंही मला ओ की ठो कळत नाही!) - अभिजित. http://www.abhipendharkar.blogspot.com/

मीनल 23/11/2008 - 18:11
रानगंधाने दाटलेल्या रात्री ढगांच्या मांडीवर चांदण्याची उशी करून झोपलेले डोंगर आवडले. मीनल.

सागरलहरी 23/11/2008 - 22:03
कवितेत रूमानी झांक आहे, तरल कल्पनारम्य कविता (पिंपळाच्या फांदीवरचा लहरी बैरागी) सागर

विसोबा खेचर 24/11/2008 - 10:03
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे वा! क्या बात है.. प्राजू, जियो..! तात्या.

राघव 24/11/2008 - 12:14
शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले सुंदर! सगळी कविताच अतिशय बोलकी आहे! मुमुक्षु

विसुनाना 25/11/2008 - 10:52
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे ही कडवी अप्रतिम. कविता खूप आवडली. डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले कल्पना आवडली. शब्दरचना थोडी अनघड वाटली.

दत्ता काळे 25/11/2008 - 11:18
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले वा, वा काय सुंदर कल्पना आहे. प्राजुताई, खरंच "जे न देखे रवी", ते तुम्ही पाहीले

चतुरंग 25/11/2008 - 17:20
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले हे खासच! चतुरंग

शितल 25/11/2008 - 19:43
प्राजु, रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले सुंदर रचले आहेस. :)

लिखाळ 25/11/2008 - 19:47
संपूर्ण कविता आवडली.. >ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले फार सुंदर.. -- लिखाळ.

वाटाड्या... 25/11/2008 - 20:33
कवितेच्या बाबतीत अगदीच औरंगजेब असण्यार्‍या मला सुद्धा कविता आवडली...विशेषतः ... रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले अगदी डोळ्यासमोर रात्रराणी उभी राहीली... मुकुल...