Skip to main content

प्रकटन

बापू..

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 11/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू. आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..! तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे. तुमची नावे घेऊन राडे करती सारे. नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले. अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले. मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते. क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते. कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ? आहे काही तुमच
Taxonomy upgrade extras

शत सर्व्हर शोधताना...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 11/12/2008 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.

`मिपा'वर गोंधळ.. (शिर्षक संपादीत)

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/12/2008 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते. कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत. मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते! एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते. हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.

पुन्हा पहिल्या सारखं

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आता तू पहिले सारखं माझ्याशी बोलत नाहीस तुझा थोडा वेळ सुध्दा माझ्या समवेत घालत नाहीस माझ्यावर तुझा राग आहे मी मान्य करतो त्यसाठी मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो मला माफ करुन तू पुन्हा माझ्याशी बोलत रहा पुन्हा एकदा नव्याने माझ्याशी मैत्री करुन पहा तू बोलली नाहीस की, दिवस माझा कटतं नाही मित्रांसोबत, घरच्यांसोबत कोणाशीही माझं पटत नाही तुझी मात्रीच फक्त आता या जीवाला हवी आहे छोट्या चुकीची फार मोठी सजा तू मला देत आहे सजा तुझी मागे घे अशी फर्याद मी करतो वाचलस तर या चुकीचा जुर्माना सुध्दा मी भरतो जुर्माना काय आहे हे तू मला सांगुन पहा पण माझ्याशी तू पहिले सारखं बोलत रहा तुझ ते दोन वाजे पर्यंत थ
Taxonomy upgrade extras

पाळणा हलला!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 07/12/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता. बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले.

पुढार्‍यांचे देशभक्ती गीत

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 07/12/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
या मातेचे कुपुत्र आम्ही आम्हास कसली लाज बटीक बनवली आम्ही तिजला भागविण्या अमुचीच खाज गरीबांच्या या टाळु वरचे आम्ही खातो लोणी नित्य नवी आम्हा लागते रम आणि रमणी कोण कुठले भगतसिंग..? अन कोण कुठले राजगुरु.. आम्ही वंदितो भाई ठाकुर अमर, अरुण, साटम गुरु.. उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!!
Taxonomy upgrade extras

आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/12/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आझम कसाब, नमस्कार, खरा म्हणजे तुला नमस्कार करायला नकोय...तुम्ही एवढा मोठ्ठा चमत्कार दाखवल्यावर आमच्या हिंदु प्रथेनुसार मी तो केलाय. तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ले करुन आम्हाला पार जेरीला आणलेस, जवळपास २०० नागरिक, कार्यक्षम दक्ष पोलिस अधिकारी यांचे बळी घेऊन मगच तुमच्या बंदुका थंडावल्या. परवा गेटवे ऑफ इंडीयावर झालेल्या रॅलीतुन यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आता नागरिकच जागे होतायत. राजकारणी आणि एकंदर ब्युरोक्रसी किती होपलेस आहे ते आता सगळ्यांना समजलय( निदान त्यामुळे २०० जणांच्या आत्म्यांना गती मिळेलंस दिसतय)...तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही.

कॉंग्रेस

लेखक अन्वय यांनी शनिवार, 06/12/2008 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीची धामधूम संपली होती निकालांचा घोष झाला... कॉंग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले चोहीकडे जल्लोष होता... ताज, ओबेरॉय, चौपाटी फुलली होती सीएसटीवर होता जयघोष... सरकार हे आमचेच आहे बाबरी पडली, दंगली झाल्या, स्फोट झाले बळी गेले सामान्यांचे... यात कॉंग्रेसचा काही दोष नाही हे तर विरोधकांचे देशविरोधी षडयंत्र आहे पाकबरोबर त्यांचे संगनमत आहे... कुणी अनाथ, कुणी विधवा, कुणी बेघर झाले तेच याला जबाबदार आहेत माणूस बुडो, राज्य बुडो, देश बुडो, जग बुडो कॉंग्रेसचे सरकार चांगले आहे सीएसटीवर जयघोष होता सरकार हे आमचेच आहे ---- जयघोष कानात घुमत असतानाच आली हाळी अरे बंड्या उठ, साडेदहा वाजत आलेत ऑफिसला जायचंय

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

लेखक कपिल काळे यांनी शुक्रवार, 05/12/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरविते सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. पदावर मुख्य नव्हता पोलिसांना मंत्री नव्हता मनी त्याचा सल नव्हता पित्त्या बसवायचा होता गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. जन्तेला फाट्या मारिले नवे नायक नाही दिले पायांना कितीक खेचले पछाड धोबी टाकले डाव कुटील किती मी खेळते........ सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते.

सुमारांच्या तावडीत...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 05/12/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.