फुलटू माज
लेखनप्रकार
कोणतीही गोष्ट कधीही कशीही आठवू शकते. .. आम्ही किती माजुरडे होतो, याची आठवण झाली.
असं म्हणतात, नुकत्याच तरूण वयात जर व्यायाम/कसरत केली की अंगात 'माज' येतो. हा 'माज' नकारात्मक दृष्टीने नव्हे, अंगात अशी एक प्रकारची रग शिरते की ती ताकद कुठे तरी कशी तरी दाखवलीच्च पाहिजे अशी माणसिकता होते. आणि मी अशा माणसिकतेतूनच गेलोय, थोडंस मोकळं करतोच ...यावरून फक्त मला 'जज' करू नका हीच विनंती. कारण काळा नुसार माणूस बदलतोच. परिपक्व होतो (अपवाद सोडता).
असो, तर लहाणपणापासून तोंडात लै जोर होता. शाळेत असताना देखिल मोठ्या पोरांना चिडवणे हा आवडता उद्योग होता. त्यांचे फटके खायचो, पण बकबक बंद होत नसे. आपण एखाद्याला एखादं नाव पाडलं की ऑटोमॅटिक पब्लिक त्याचं ओरिजिनल नाव विसरत आणि त्याला मी नामांकित केलेलं नाव पडे. लै मार खायचो. थोडा मोठा झालो. अकरावी-बारावी.भोसरीत (भोसरी एम.आय.डी.सी. आशियातला सर्वात मोठा इंडस्ट्रियल झोन आहे, म्हणजे आपल्याला माहित असायला हरकत नाही. ) रहायला आलेलोआमचा इलाका म्हणजे फुलटू भाईगिरी वाला इलाका. इकडे भाई, तिकडे भाई, भाईच भाई... निसत्या गँगवॉर मारामार्या. आणि आम्ही असे नविन.. तोंडात जोर.. हाईट सहा फूट आणि वजन साठ किलो.. फुल पाप्याचा पितर. तसे माझे चुलत भाऊ तिथं भाईच होते म्हणा. पण आम्ही आपले मारखाऊ.. मग एकदा पेटलो. कॉलेजला गेल्यावर जिम लावली (२३ फेब्रु २००२). आधी आपली कामचलाऊ नगरपालिकेच्या जिम मधे जायचो. चुलत भाऊ सकाळी उठवायचा.. त्याचा लै राग यायचा .. पण आपला मुग गिळून त्याच्याबरोबर जावं लागे. एक दिवस उठलोच नाय. त्याने मला खांद्यावर उचलून जिम ला नेला आणि घराखालच्या रोडवर ठेवला. सकाळच्या गारठ्यात लैच टोचत होतं म्हणून उठलो. ३ महिइन्यात जिमची नशा एवढी चढली की एखाद्या अट्टल बेवड्याला दारूची नसावी. ३-३ तास जिम मधे फुल्टू हेवीवेट याम करणे यात जो आणंद मिळे... तो अजुन कुठेच नाय मिळे. ६ महिन्यात बॉडी. झकास .. आणि मग आंगात 'माज' नावाची गोष्ट आली. दिसला कोणी आणि नडला ही हाण तिज्यायला. ...बापाला कौतुकच भारी.... ऐपतीप्रमाणे खुराक .. रोज अर्धाकिलो चिकनची उक्कड मिळायची. चिकन नसेल त्या दिवसी १० अंडी उकडलेली(पिवळा भाग काढून) आणि तेही नसलं तर " चहा चपाती" आता चपात्या अंमळ ६च्या वर निघुन जायच्या .. पण आईने कधी कंटाळा नाय केला बॉ .. आता हेवडं सगळं मिळत आसल्याव आंगात 'माज' यणारच की... आपला एक मित्र होता.. विशाल.. (इशल्या)... ५ फुट २ इंच .. जिम मधे पार्टनर.
दोघं मिळून पार कुथून कुथून याम करायचो. स्कॉटला तर लैच मज्जा यायची. कोण जास्त वेट मारतो याची शर्यत अघोषित पणे लागायची. जिम मधली नवी पोरं मस्त आमच्या भोवती राउंड करून उभी रहायची. काही पब्लिक हेव्याने आमच्या एवढी वजनं मारायला जायचं आणि क्रँप करून घ्यायचं .. तर 'माजा'चा मुद्दा असा... इशल्याच्या घरापाशी हे युपीबिहारी बॅचलर पोरं रहायची... एका सिंगल रूम मधी ७ जणं च्यायला झुरळांचेच वंशज.. कशे मावायचे माहित नाय. त्या बिहार्यांपैकी एकाने इशल्याच्या भैनीला काही तरी कमेंट पास केली. आम्ही जिम वरूनच येत होतो.. जसा मॅटर कळाला ( आम्हा सगळे लोचे, भानगडी कींवा काय असंल त्याला "मॅटर"च म्हणायचो) .. तसा इशल्या बोंबलला.. चल आपल्याला एकाला कुथवायला जायचंय.. मला हर्षवायू झाला.. घामाचे कपडे न बदलता तसाच बिहार्यांच्या रूमवर... इशल्यानी दरवाज्याला 'जंजीर' स्टाईल लाथ टाकली. ७ पैकी ५ बिहारी लोळत पडलेले.
त्यात मुख्य आरोपी पण होता.. इशल्याच्या डोळ्यार रगात उतरलेलं.. आणि मी आपला नेहमी प्रमाणी हिहिहि करत मागं हुबा होतो... इशल्यानं डायलॉग टाकला ज्याला तंगड्या शाबुत ठिवायच्यात त्यानी पळा.. ह्ये आज मार खाणार.. एक बिहारी पळतच होता.. त्याच्या पार्श्वभागावर लाथ टाकायची इच्छा काय आवरली नाय. ते उंबरठ्यात पडलं.. उरले ४ बिहारी.. इशल्याची हाईट कमी.. ते मोरीवर चढलं अन हाणायला लागलं.. १ जण बोलायला तोंड उघडणार तशी सान्न कन त्याच्या तोंडात पडली.. त्याच्या मानेला एक हिसका दिला आणि त्याला बाहेर ढकलला.. ते ढकलंन एवढं हळूवार होतं की त्याला पडावंच लागलं.. मुख्य आरोपीला इशल्यानी तिंबवला.. त्यानी तोंड झाकायचा प्रयत्न केला की पोटात लाथा अनं पोट दाबलं की तोंड चेपने.. १० त्याला हाणून झाल्यावर निघावं ना ? बाकी दोघं कोपर्यात गप बसलेली .. त्यांच्या बी पेकाटात लाथा बसल्या. त्यादिवशी आत्मशांती मिळाली... फुलटू माज
एक दिवस पिंपरीच्या एच.ए. ग्राऊंड बसस्टॉप ला उभा होतो. कॉलेजातून घरी येत होतो. डि.वाय.चं पब्लिक असतं.. एकंदरीत पक्षी असलेला बस स्टॉप. त्यादिवशी सबमिशन ने वैतागलेलो. आणि थोडा रागातच होतो. पाऊण तास झाले बस नाही. अजुनच चिडचिड झाली. एक बस आली.. ती जाम भरलेली. आणि दोन झोपडपट्टीवीर मागच्या दरवाज्याला लटकलेले.तोंडात गुटखा,पुर्ण झोपडपट्टी वेश.बस थांबली.. पोरी चढायला लागल्या तर भौंनी एका हाताने बस ला लोंबकळून एक तंगडं हवेत अशी त्यांना जागा करून दिली.त्या चढल्या नाहीत. मी चढेपर्यंत बस सुटलीच.. चढणार तर ह्यांनी जागा दिली नाही.. अन् बस सुटली.गप होतो.. पण बस निघली आणि त्यांच्यातली **मस्ती जागी झाली.. माझ्या उद्देशाने .. "ए .. **द ... चल्ल्ल्ल्ल्ल निइइइइइइघ .. भा*** " अरेच्च्या ,, ब्रेन टेंप्रेचर काही मिलीसेकंदात १०००डेग्रीच्या वर गेलं.. आता बस स्टॉप संपला की पुढे एक चौक होता, मासुळकर कॉलनीच्या बाजूने एक बस आली आणि ही बस थांबली.. आपसूकच पळत गेलो.. मघाच्या विराला पोटरीला धरून खाली ओढला...तो आपटलाच .. त्याचा आवाज आणि हात एकदम माझ्या रोखाने आले.. मी सावधच होतो.. पण आमचे कानुन से लंबे हाथ खान्न कन कानाखाली बसले दुसरी लाथ गुढग्यावर बसली.. (गुडघे फोडणे हा एक राक्षसी आणंद होता) .. पोरगं केकलंत खाली बसलं ते झोपलंच .. नविन शुज होते.. दुसरी,तिसरी,चौथी लाथ पोटात .. थोड्यावेळाने जमीन ओली झाली .. मला किव आली.. त्याला उचलायला हात दिला .. तर भाऊ पळूनच गेले. .. फुलटू माज
कॉलेजला जाताना कासारवाडी ते अकुर्डी हा नियमित प्रवास होता. ९.२० ची लोकल, दुसरी बोगी, तिसरा दरवाजा, ही आपली हक्काची जागा ठरलेली असायची. कोणी असलाच तर त्याला आपसूक दाबून टाकले जाई .. नाही तर चावर्या कुत्र्यासारख्या नजरेनेच हलवलं जाई.. तर असाच एक दिवस. कोणीतरी सिगारेट फुंकत होता. आता सगळा स्मोक माझ्या नाकात जात होता. एकदाच समजावलं भौ चलती ट्रेने मे सिगरेट पिना तो हानिकारक है ही .. पण मेरे सामने पिणा पण हाणिकारक है .. सांगितलं .. नाय ऐकलं .. नेक्श्ट टैम तोंडातली सिगरेट काढली अन फेकली .. तोंडातून आवाज चढणार इतक्यात डोकं आणि लोखंड वाजल्याचा टन्न कन आवाज झाला, चिंचवड स्टेशन ला भौसाहेब उतरून गेले .. फुलटू माज
एकदा पुण्यातल्या कोणत्याश्या कॉलेजात काही राडा झाला होता, तेंव्हापासून आमच्या कॉलेजात सिक्युरीटी वाला गेटपाशी आयकार्ड मागायचा... माझ्याकडं आयकार्ड असायचं पण मुद्दाम काढायचो नाय.. शिक्युरीटीनी आयकार्ड इचारला.. तोंडावर रेड्याची गुर्मी. "आयकार्ड नाय भो .. " , "आयकार्ड शिवाय यंट्री नाय " -शिक्युरीटी..
काय करणार बे ? आणि निघायला लागलो , गार्डचा हात आडवणार तोच असा दाबला की भौ गपगार बसले. त्यानी हेड गार्डला तक्रार केली असावी. हेड गार्डने मला पाहिल्यावर 'दादा' 'दादा' चा पाढाच लावला राव... कँपस मधे जिथं दिसेल तिथं 'काय दादा काय चाल्लय' 'नमस्कार''चमत्कार' च्यायला आपली हवाच... फुलटू माज ..
एकदा बॉडीशो ला गेलेलो.. बाहेरून आलेल्या जिमची पोरं होती .. काही तरी राडा झाला आणि शो च्या जागीच मारामार्या सूरू झाल्या .. फुल बेंच.. टेबलं उचलू उचलू मारामार्या... तिथं मिटली .. बाहेर जाउन परत मारामार्या. पण घाबरू नका.. मी नव्हतो त्या मारामारीत ... मी स्टेज वर होतो ना :)
एकदा बस मधून येत होतो . एक १०-१२ वर्षाचं पिटूकलं लैच गरीब .. बिचारं खिडकी उघडी ठेऊन बाहेरची गंमत पहात होतं .. रात्री आठवी वेळ होती .. घरी परतंत होतो. त्या पिटूकल्याला मागे बसलेल्या एकाने अजानक डोक्यात जोरात हानली... कळलंच नाही काय झालं .. त्याने मागं पाहिलं आणि मारणार्याला का मारलं विचारलं तर दुसरा फटका .. अरे ? डोक्यातच गेला ... तिसरा मोठा आवाज झाला यावेळी त्या मारणार्याच्या डोक्यात बसली होती. मी आपला गप उभा होतो जसं मला माहितच नाही कोणी आवाज काढला तो.त्याने माझ्याकडे पाहिलं अन् गुमान गप्प बसला, :) बाकी पब्लिक येड्यागत नक्की काय झालं तेच पहात होतं .. फुलटू माज
कॉलेजचा काळ होता, त्यामुळे 'माज' होताच .. कामाला लागलो .. आणि 'माज' गायप झाला. आता मारामारी जवळ जवळ नाहीच :) आता आम्ही फॉर्मल फॉर्मल वागणारे , गोड गोड बोलणारे पांढरपेशी झालेलो आहोत.
-----------------------------------------------------------------------------(माजलेला रेडा) टार्या
वाचने
5688
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
टार्या........
In reply to टार्या........ by मृगनयनी
:-)
In reply to :-) by टारझन
चांगले केले...
In reply to :-) by टारझन
९५% वेळा
In reply to ९५% वेळा by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
टार्या...
झकास!!!
In reply to झकास!!! by पांथस्थ
होय
मस्त अनुभव
टार्स लै
मनाने खूपच भाबडे
In reply to मनाने खूपच भाबडे by कपिल काळे
शरीर कमावण्यामुळे
मस्त लिहिले आहेस.
हा माज नव्हे..
In reply to हा माज नव्हे.. by प्राजु
सहमत
सही रे माजो-या!!!(ह.घे.)
फंडू रे टार्या!
टार्या
मस्तच
In reply to मस्तच by स्वानन्द
मस्त रे