मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

अमेरिकेतील गुजराती मंड्ळ

खटपट्या ·
मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती. मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है) मुळात गुजराती मंडळात का गेलो?

याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस भारतात व्हावा।।

kvponkshe ·
१९९९ साली आमचे स्टेशनरी चे भाड्याचे दुकान होते . त्याच्या कामानिमित्त मला अनेकांकडे जावे लागे. त्यात एक दूरचे नातेवाईक होते त्यांच्या कडे नेहमी जाणे होई. त्या नातेवाईकांची एक मुलगी होती. मी त्या वेळी ऐन तारुण्यात होतो, लग्नाळू होतो. ती मुलगी मला आवडत असे. तिला सुद्धा माहित होते की मी तिच्यावर लट्टू आहे. माझी हिरो होंडाची cd १०० SS घेऊन मी त्यांच्या कडे सामान द्यायला दोन एक आठवड्यातून जात असे. ती घरात असावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असे, आणि ती दिसली की मनात फुले उमलत असत. ते लोकही मला चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसत.

स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग (ऐसी अक्षरे ३५)

Bhakti ·
1 पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .प

गृहकृत्यदक्ष(?) कवियित्रींसाठी मार्गदर्शन. !!

कानडाऊ योगेशु ·
कवियित्रींना साधारण गृहीणीसारखे पण वावरावे लागते व कविता लिहुन रसिकांना ही खुष ठेवावे लागते. हे फार कसरतीचेच काम आहे. मी खाली काही Techniques देत आहे जे वापरल्यावर कवियित्रींना ग़ृहीणीच्या रुपात वावरताना सुध्दा कविता लिहिण्यात काहीच अडचण येणार नाही. नेहेमीच्या रोजच्याच वेळात घरकाम करता करता बर्याच प्रसंगातुन स्वत:मधील कवियित्रीला कसे जिवंत ठेवायचे हे समजायला त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल. मी खाली काही काव्यप्रकार कवियित्रींनी केव्हा आणि कसे वापरायचे हे सविस्तरपणे सांगितले आहे. खरेतर खालील उपाय वाचुन इतर गृहीणी सुध्दा कविता लिहु शकतील. काही समस्या असल्यास व्यासपीठावर मार्गदर्शन करणेत येईल. --

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि ·
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

थॅंक यु संक्षी !

उन्मेष दिक्षीत ·
ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत ! मला माहीत नव्ह्ती अध्यात्माची जादू ! यु न्यु बेटर ! तुम्ही माझ्या चुकांना माफ करत आलात , पण आता शेवटच्या चुकीनंतर माझ्याकडून माफी मागण्याचही डेरिंग झालं नाही ! पण आभार व्यक्त केल्याशीवाय राहावत नाही ! थँक यु फॉर ऑल्वेज केरींग फॉर मी ! वेअर एम आय ? :) - उन्मेष

पुस्तक परीचय-के कनेक्शन्स

राजेंद्र मेहेंदळे ·
k नमस्कार मंडळी नुकतेच प्रणव सखदेव या लेखकाचे के कनेक्शन्स वाचुन संपवले. "दिल का हा सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहते रहेगा कहनेवाला" हे गाणे तुम्ही ऐकले असेल तर हे पुस्तक तसेच आहे. सातवी/आठवीत असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या नजरेतुन हे पुस्तक लिहिलेले आहे.

खूप थंडी आहे यंदा

पाषाणभेद ·
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

कारखान्याची गोष्ट

स्पा ·
नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया.

तिकोना-फोटोवारी

राजेंद्र मेहेंदळे ·
नमस्कार मंडळी ऑफिसच्या कामाने वैतागलेला मी आणि कॉलेजच्या अभ्यासाने वैतागलेला माझा मुलगा बरेच दिवसापासुन कुठेतरी बाहेर पडायचा प्लॅन करत होतो. पण आज काय घरात साफसफाई, उद्या नवरात्र, परवा पाउस बदाबदा कोसळतोय अश्या कारणांनी ते राहुनच जात होते. पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते. पण मूहूर्त लागत नव्हता. शेवटी एका शनिवारी ठरवले की आता बास, उद्या निघायचे म्हणजे निघायचेच. रविवारी सकाळी साखरझोपेवर मात करुन क्लास आणि भाजी आणणे वगैरे कामे उरकुन आरामात का होइना पण ९ वाजता निघालो. वाटेत जुन्या हायवेला देहुरोड टोल ओलांडुन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि भरल्या पोटाने पुढे चाल केली.