खांब-२
लेखनप्रकार
"Are you going to psyche me"? If it is so, you will be fourth.
अशीच एक शाळा. असाच एक कार्यक्रम.
कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापिका जरा भावुक झाल्या सारख्या वाटल्या.
अजुनही जाणिवा बोथट न झालेल्या. शिक्षक पिढी घडवतो या गैरसमजात वावरणार्या.
"सर , पालकांसाठी पण एक कार्यक्रम कराल. आजकाल पालक होणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे"
तसे शिक्षक होणे सुद्धा.
"हो तेही बरोबर आहे म्हणा. जमत नसेल तर पेशा सोडायचा चॉइस असतो. पालकत्व सोडता येत नाही"
हम्म.
"तुम्हाला थोडा वेळ आहे का"? जरा एक कॉम्प्लिकेटेड केस आहे. बघा तुम्हाला काय करता येते का"?
ऑफिस मधे पोचल्यावर थोड्या वेळात एक आजी, आजोबा आणि आई आले.
आई ४० शी ची.
त्यांच्या मुख्याधिपकेबरोबरच्या चर्चेत साधारण स्वरुप लक्षात आले.
थोड्या वेळाने मुलगी आली.
ती शाळेच्या युनिफॉर्म मधे नव्हती.
शाळेत येणे अगदी अनियमित.
दहावीत असलेल्या ह्या मुलीचा चेहेरा वयापेक्षा खुपच प्रगल्भ.
३ वर्षापुर्वी टी.आर्.पी मधे आघाडीवर असलेल्या एक सिरियलची नायिका.
डान्स कॉपिटीशन मधुन निवडली गेलेली.
चंदेरी दुनियेत मिळणार्या उदो उदो नंतर अचानक पोकळी.
सहा महिन्यापुर्वी बिझिनेस मॅनेजर कम सेक्रेटरी कम ड्रायवर कम वडील निर्वतलेले.
अॅपियरन्स मनी, उदघाटने, जाहीराती , सिनेमातला एक छोटाश्या रोलमधे खुप पैसा मिळाला होता.
त्यातला अर्धा वडीलांनी आपल्या चैनीकरता उडवलेला.
आईने वेळीच एक फ्लॅट व गुंतवणुक केली नसती तर काहीच शिल्लक राहीले नसते एवढी मुजोरी वडीलांनी दोन वर्षात केली होती.
रोज सकाळी १००० रुपयाची मागणी.
नाही दिला तर तारस्वरातील भांडणे, आईबरोबर मारामारी, वस्तु फोडण्याच्या तमाशा.
आजी आजोबाशी उभे वैर.
नातीच्या शिव्या आणि पदोपदी अपमान ह्या वयात त्या म्हातारा म्हातारीच्या नशिबात आलेला होता.
सकाळी आठ वाजता पैसे घेउन निघायची रात्री किती वाजता परत येईल ह्याचा नेम नाही.
बरोबर सिरियलमधे नाते निर्माण झालेला समदु:खी मित्र.
सर्व उपाय थकले होते.
डोळ्यात कुठलीही भिती न बाळगता तो प्रश्न तीने विचारला.
चँपियन बरोबर गाठ होती. निट विचार केला आणि प्रतिप्रश्न केला.
तु दहावी पुर्ण करणार आहेस का?
"हो"
शाळेत न येता?
"मला एक महीना पुरे आहे.
पण शाळेत न येता तुझा फॉर्म कसा भरला जाईल.
"भरला जाईल. मी शाळेला किती तर बक्षिसे मिळवुन दिली आहेत"
तुला १०वी नंतर काय करायचे आहे?
"आर्टस"
गुड. कुठे?
तीने मुंबईमधील एका प्रतिथयश कॉलेज चे नाव सांगितले.
तिथे मागच्या वर्षीचा कटऑफ ८०% होता. एवढे % मॅनेज होतील का? त्या कॉलेजम्धे तुझ्या सर्व कलागुणांना (?)संपुर्ण वाव मिळेल.
मुलगी गोधळली.
एक काम कर. आजपासुन रोज शाळेत ये. निट अभ्यास कर. कसा करायचा ते मी सांगतो. ८०% मिळव. तु मोकळी. हे तिघेही मोकळे.
" मी वर्गात काय एकटीच नाही. माझ्या सारख्या विचारसरणी च्या ४मुली आणि २ मुलगे आहेत"
पण ते शाळेत येत आहेत. तु मुक्त जगते आहेस.
"पण मी माझ्या पैशाने मला हवे तसे जगते आहे. त्यावर कुणाचा काहीही हक्क नाही."
कबुल आहे. तुला आजी आजोबा आवडत नाही. आईचे तोंड बघावेसे वाटत नाही.एक घरात राहून रोज एकमेकांना त्रास देण्यापेक्षा आपण एक करार करु. सर्वांचा त्रास वाचेल. तु रोज शाळेत ये. अभ्यास कर. मार्च पर्यंत तुला खर्चाला एक ठराविक रक्कम घे. हजार नाही हां
मित्राला म्हणावे, आता परिक्षा झाल्यावरच भेटु. मार्चनंतर परत काम शोधायला सुरु कर. एकदा का तु कॉलेज मधे जायला लागलीस की तुझे पैसे तुझ्या हवाली. तुला हवे असेल तर घरी राहा. स्वतंत्र राहयचे असेल तर तुझ्या फ्लॅट मधे जा. मार्च नंतर तुझी मुखत्यार तु. ह्या सर्व मंडळीचे तुझ्यावर आजही तितकेच प्रेम आहे. तुझ्या गरजेला केंव्हाही हाक मार. हजर राहतील. तुझ्याकडुन मात्र काहीही अपेक्षा नाही. एक विचार कर मात्र. वडीलांनी केलेल्या चुकीला ह्याना का जबाबदार धरतेस?
"त्याचे नाव काढु नका. नराधम होता तो. माझ्या पैशावर बाया नाचवल्या त्याने. आईला वेळीच सांगितले होते मी. प्रोड्युसर पुढे पण ढकलले होते मला त्या हलकटाने. मेला लवकर - सुटले मी"
ओके. तो भुतकाळ होता. आई काही करु शकली नाही. आता झालेली शिक्षा पुरे की. आता माफ कर तीला. ३ महीन्यापुर्वी तुझ्या गर्भपाताच्या वेळी ती नसती तर तु वाचली असतीस का? आता या सुडकधेला विराम देउ. नव्याने सुरु करु. तुझ्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला कुणाचाही विरोध नाही. पण तो अनिर्बंध नसावा अशी अपेक्षा बाळगणे हे चूक आहे का? तु सज्ञान झालीच की तुला हवे ते कर. तुझ्यावर पालकत्व लादले जाणार नाही. आणि हे पालकत्व तुझ्याकडुन कसलीही अपेक्षा न बाळगता तुझ्या गरजेला उभे राहील. त्यानी आपण पालक असल्याचा खांब आजपासुन सोडला आहे.चालतय का?
प्रथमच मुलीच्या चेहेर्यावर प्रसन्न हास्य दिसले.
जाता जाता: हस्तांदोलन करता करता म्हातारा गहिवरला. I OWE you. I am going to write about this on... site. त्याने साइट च नाव सांगितले. मी थक्क.
वाचने
3107
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
श्री
श्री रा रा
In reply to श्री रा रा by अवलिया
अवलिया
In reply to अवलिया by विनायक प्रभू
श्री रा रा
What is expected out of this
©º°¨¨°º©
In reply to ©º°¨¨°º© by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
लेख आवडला
तिला
In reply to तिला by रेवती
+१
चुकीच्या रुळांवरुन फार