खांब-१
लेखनप्रकार
"उद्या संध्याकाळी येशील का जरा"?
साखरपुडा का?
"जरा घोळ झालाय. माझ्या कक्षेबाहेरचे आहे. तुच श्रुती कडे बोल. मी 'जांबुवंत जमान्यातला'.
दे फोन तीला.
"काका, बाबांच्या आकांड्तांडवाकडे तुम्ही लक्ष देउ नका. माझी काहीही चुक नाहीये. तुम्ही उद्या या. सविस्तर बोलु. फोनवर नको"
दिपक म्हणजे अगदी पाणी सुद्धा फुंकुन पिणार्या पैकी. आणि श्रुती सुपर फास्ट एक्स्प्रेस. दोघांचाही नाइलाज. असे वाद कायमचे होत असत.
घरी पोचल्यावर श्रुती सोडुन सर्वांचे चेहेरे सुतकी.
गेल्याच आठवड्यात श्रुतीचे लग्न ठरले होते. फक्त साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरायची होती. श्रुतीची जनरल प्रॅक्टिस नुकतीच सुरु झाली होती. मुलगा सुद्धा अगदी सर्वार्थाने मॅचींग होता. बघण्याच्या कार्यक्रमात दोघांनाही आपल्या आवडीनिवडी ची चर्चा करायला पुरेसा वेळ दिला गेला होता. दोघांनी होकार दिल्यावर बाकीची बोलणी सुद्धा बिनघोर पार पडली होती. पण जाता जाता श्रुतीने मुलाच्या हातात एक एनवलप दिले आणि त्याला म्हणाली,"I hope you will understand this and reciprocate from your side".
दुसर्या दिवशी मुलाच्या बापाचा फोन आला.
"असली थेर आम्हाला जमणार नाहीत. लग्न मोडले तरी चालेल"
श्रुती ने मुलाला आपला रिपोर्ट दिला होता. अगदी एच्.आय्.वी टेस्ट सकट.
"काय गरज होती हा भोचकपणा करायची. आमची लग्ने झाली नाहीत का? मुलगा अगदी सरळ्मार्गी आहे "दिपक ने दिवे पाजळले.
श्रुती खुदकन हसली.
"आता ह्यात हसण्यासारखे काय आहे"?
'सरळमार्गी' ची एटीमॉलॉजी दिपकला समजणे शक्यच नव्हते.
"हे बघा बाबा, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही शांत रहा"
आता हा तिढा सोडवायचा कसा? तो विचारात पडला.
हे बघ, एकंदरीत मुलाच्या घरातील 'वाता-वरण' संरक्षित दिसते आहे. वडिलांना विरोध न करु शकणारा मुलगा तुला चालेल का. नसेल तर प्रश्नच संपला. किंवा अशा घरात असल्या विषयावर समोरासमोर संपुर्ण चर्चा करण्याची बंदी असते त्यामुळे मुलगा बोलु शकत नाही हा बेनिफिट ऑफ डाउट तु त्याला देणार?तसे असेल तर बसुन बोलुया त्याच्या वडिलांकडे.
"वडिलांबरोबर तो पण असला पाहीजे. मला लग्न त्याच्याबरोबर करायचे आहे"
अग गधडे, त्याच्या हातात एनवलपचा बाँब देताना जरा बोलुन तरी द्यायचा ना. सगळेच काही तुझ्यासारखे एन्लाइटन्ड नसतात.
"काका, डबल ग्रॅज्युएट आहे तो"
ते काही सांगु नकोस. कौमार्याबद्दल चुकीच्या आणि खुळचट कल्पना असलेले कीती डॉक्टर दाखवु तुला मी.
तुला काय म्हणायचे आहे त्याची भाषा बदल. त्याना झेपेल अशा भाषेत बोल.
"तुम्ही सांगाल ती भाषा वापरते काका"
दोन तासात मंडळी आली. मुलगा अगदी देखणा.
जास्त गुळ न काढता श्रुतीने सांगितल्याप्रमाणे लगेच मुळ प्रश्नाला हात घातला.
" ब्लड रिपोर्ट ही एक आजची गरज आहे. त्यात तुझ्या चारित्र्यावर संशय वगैरे काहीही नाही. तुला आठ महिन्यापुर्वी अपघात झाला होता तेंव्हा दोन युनिट्स द्यावी लागली होती हे तुच सांगितलेस मला. मला माझ्या पेशात होणार्या 'ह्युमन एरर' ची जाणिव आहे. फक्त शक्याशक्यते चा पडताळा. उगाच भावी आयुष्याची धुळधाण कशाला"?
मुलाच्या बापाच्या चेहेर्यावर गोंधळ.
दोघेही गॅलरीत गेले.
त्याने श्रुतीला थंब्स अप ची खूण केली.
पंधरा मिनिटाने मुलगा आणि बाप दोघेही आत आले.
खांब सुटला होता.
मुलगा खुल्या दिलाने सॉरी म्हणाला.
३ आठवड्यानंतरचा मुहुर्त ठरला.
जाता जाता: बाजारातुन काहीतरी आणण्याच्या निमित्ताने श्रुती त्याच्याबरोबर खाली उतरली.
" काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते. सरळ मार्गी लोकांचे काय सांगता येत नाही बघा. मी कशाला उगाच रिस्क घेउ. त्याच्या भुतकाळाशी माझा काही संबध नाही. असेल नसेल मला त्याचे काही ही नाही. भविष्य काळ माझ्या हातात. आ़णि अशीच भुमिका त्याने पण घ्यावी अशी अपेक्षा. काय चुक आहे का?"
ह्याचा अर्थ तु.....
" बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"
वाचने
6781
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
एच आय व्ही +
उत्तम!
In reply to उत्तम! by सहज
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत by नंदन
फक्त २० मिनिटे
In reply to फक्त २० मिनिटे by लंबूटांग
परत तिच
In reply to फक्त २० मिनिटे by लंबूटांग
+ve/ -ve
मूल्ये
In reply to मूल्ये by मुक्तसुनीत
लेख आवडला.
खांब १
छान
In reply to छान by अवलिया
यावरुन मला
In reply to छान by अवलिया
अगदी
खांब चा
पण मुलगी रक्त तपासुन रिपोर्ट देते , म्हणुन
मास्तर
>>>काका खर
>>>काका खर
>>>काका खर
In reply to >>>काका खर by संजा
माहीती
In reply to माहीती by विनायक प्रभू
मग
In reply to मग by संजा
ते
In reply to ते by विनायक प्रभू
बरं
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
खंबा...
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
शीर्षक चुकून 'खंबा' असे वाचले...
ह्हा ह्हा
In reply to ह्हा ह्हा by टारझन
टारु तु
In reply to ह्हा ह्हा by टारझन
टारुदत्ता
प्रत्येक
हम्म! मला
अतिशय ज्वलंत पण दुर्ल् क्शित विषय आहे हा..
मास्तुरे चांगला आहे लेख.
In reply to मास्तुरे चांगला आहे लेख. by चतुरंग
>>>वरती काही
>>पण जाता
चांगला लेख.
मास्तर लेख