Skip to main content

प्रकटन

आटपाट नगर होतं...

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/02/2010 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं. अतिशय समृद्ध नगर. तिथे चहुकडून लोक येत असत. त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना! तर ही गोष्ट आहे एका चंदूची. चंदू लहानपणापासूनच हुशार. उत्तम शिक्षण घेतलेलं. नोकरीसाठी तो ह्या समृद्ध नगरीत आलेला. अबब! केवढ्या उंच इमारती, केवढा झगमगाट केवढी गर्दी म्हणता म्हणत तो त्या गर्दीचा भाग कधी झाला त्यालाही कळलं नाहि. त्या शहरानेही त्याला कवेत घेतलं होतं. एक दिवशी त्याच्या मित्राने विचारलं काय रे संध्याकाळच्या वेळेत टॅक्सी चालवणार का? उत्तम शिक्षण असलं तरी अजून पैसा मिळाला तर हवाच होता.

पण शाहरूख खान ने एक चूक केली

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/02/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच). गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला.

आज हिंदुस्तानका हर बूढा संकेतस्थळ मालक बनना चाहता है!

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 11/02/2010 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
(आमची प्रेरणा: आता, सांगायलाच हवी का ?) हल्ली कधी कधी असे व्यनी येतात की ते वाचून मला जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून टुकार आहेत. तेव्हा आता डायरेक्ट विवक्षित ठिकाणी हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार रखडत रखडत चालू आहे. मनोगतासकट इतरही अनेक पोर्टल्स (सदस्यत्व रद्द होईपर्यंत) आणि आता स्वतःचा ब्लॉगही (जो कोणी वाचत नाही) अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो (हल्ली निनावी).

विकेट!!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 10/02/2010 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुचिताईंचा हा गंमतीशीर धागा वाचला आणि तुम्हासर्वांप्रमाणेच मीही माझ्या राशीबद्दलची निरीक्षणे पाहिली. यावरून विचारांची गाडी तडक आमच्या ऐतिहासिक प्रेमकहाणी कडे वळली! (प्रत्येकालाच आपली/आपल्या प्रेमकहाणी/प्रेमकहाण्या ऐतिहासिक वाटते/ वाटतात राव! ;) एखादा प्रेमवीरांचा चित्रपट पाहताना प्रत्येकजण त्यात स्वतःची प्रेमकहाणी बघतच असतो! ) अर्थातच आम्हाला आम्ही साजरा केलेला ऐतिहासिक व्हॅलेंटाईन डे, ज्या दिवशी (नि)धडधडत्या छातीने, थरथर कापणार्‍या हातात गुलाब घेऊन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीला 'इलू' चा अर्थ समजावला होता, तो दिवस आठवला.

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

लेखक नीधप यांनी बुधवार, 10/02/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या.

< मोफत मोफत मोफत >

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 08/02/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ८.२.२०१० ते १५.२.२०१० या कालावधीमध्ये माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी. नाव जन्म तारीख जन्मस्थळ जन्मवेळ एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. http://rajeev-upadhye.blogspot.com/

आणखी किती सतिश शेट्टी?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/02/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता. परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.

...म्हणून सासू ही 'आई' होऊ शकत नाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/01/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला. त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का! सासू ही आई होऊ शकत नाही, कारण... १. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्‍यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही. २. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते. ३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते. ४. या वयात हॉस्पिटलच्या वार्‍या नि खर्च परवडणारा नसतो. ५.