रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही.
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते. छोट्या छोट्या टपरीमध्ये हॉटेल्स चालू होती, घरगुती जेवणापासून एक धाबा पण गडावर पाहिला नवल वाटले. चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे ह्यांच्या मुळे गड असा गजबजून गेला होता. सुंदर मुली आपल्या आपल्या बुजगावण्यांना संभाळत आईसक्रिम खात इकडे तिकडे बागडत होत्या.
मला क्षणभर शंका वाटली व मनात आले चुकुन आपण सिंहगड सोडून कुठल्या तरी पिकनिक स्पॉटवर तर नाही ना आलो. पण थोड्याच वेळात जेव्हा मी थोडा पुढे गेलो तेव्हा शिवाजी महाराजांचा अर्धकार पुतळा दिसला व त्याच्या जवळच गडाची माहीती.
मी सर्वांना निरखत पाहात गडाच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य हे पाहून थोडे मन विचलित होत होते. गडावर असलेली छोटेखानी हॉटेल्स पाहून खरोखर नवल वाटले, एतिहासिक वास्तू च्याजवळ प्रदुषण निर्माण करणारे कोणतेच कार्य होता कामा नये असा आदेश ह्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे शक्यतो महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याला माहीत नसावे की काय असा हाल.
गडावर पाहण्यासारखं काही राहिलेच नाही आहे, दारुचे कोठार, घोड्यांचा पागा, टिळक भवन व थोडीफार वाचलेली तटबंदी. निसर्गाच्या अवकृपे पेक्षाही जास्त अवकृपा मानवाने केली आहे ह्या गडावर. एखादे नितांत सुदर स्थळ कसे बरबाद करता येईल ते आपल्या कडून शिकावे जगाने. आरडाओरडा, दंगा ह्यांची रेलचेल दिसत होती. जेथे जेथे कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल व त्यांचे प्रणयचाळे.
गडाच्या तटबंदीबरोबर पुर्ण दोन चक्कर मारली गडावर फोटो घ्यावे असे काही दिसलेच नाही, व जेथे काही फोटॉ घेऊ असा विचार येत होता तेथे माणसांची गर्दी कमी होत नव्हती त्यामुळे आसपासच्याच निसर्गाचे फोटो काढले त्यातील काही निवडक फोटो येथे देत आहे.


वाचने
12782
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच ........
माधुरी
In reply to मस्तच ........ by माधुरी दिक्षित
चुक तुमची आहे...
श्री.
In reply to चुक तुमची आहे... by प्रसन्न केसकर
मनस्ताप
In reply to श्री. by दशानन
लेखन आणि अनुभूती
In reply to मनस्ताप by अवलिया
श्रावण
In reply to लेखन आणि अनुभूती by श्रावण मोडक
@ श्री रा रा
In reply to लेखन आणि अनुभूती by श्रावण मोडक
श्रावण
In reply to @ श्री रा रा by अवलिया
अगदी!
In reply to श्रावण by परिकथेतील राजकुमार
हो, खरे आहे...
In reply to @ श्री रा रा by अवलिया
गडाची
श्री
In reply to गडाची by परिकथेतील राजकुमार
'बुजगावणे'
In reply to श्री by दशानन
परिकथेतील
In reply to 'बुजगावणे' by परिकथेतील राजकुमार
छान
राजा फोटो
झकासराव-जी,
In reply to राजा फोटो by झकासराव
राजे भटकंती मस्तच झालीय
जयपाल
In reply to राजे भटकंती मस्तच झालीय by jaypal
ह्म्म
सहज-जी, पुढ
In reply to ह्म्म by सहज
राजमान्य
In reply to सहज-जी, पुढ by दशानन
श्री
In reply to राजमान्य by विजुभाऊ
जगदंब
मला नाही
रविवार
श्रावण
In reply to रविवार by श्रावण मोडक
राजेंसहीत सर्वांना (धोक्याची ) सुचना
जैपाल
In reply to राजेंसहीत सर्वांना (धोक्याची ) सुचना by jaypal
सिहंगडाच्
निखिल
In reply to सिहंगडाच् by निखिल देशपांडे
ते
In reply to निखिल by दशानन
फ्रॅक्चर
In reply to ते by फ्रॅक्चर बंड्या
ते मनोरे आकाशवाणीचे नव्हे
In reply to फ्रॅक्चर by दशानन
श्री
In reply to ते मनोरे आकाशवाणीचे नव्हे by प्रसन्न केसकर
मस्त ...
स्नेहाराण
In reply to मस्त ... by sneharani
अतिशय
श्री
In reply to अतिशय by टारझन
+१
In reply to अतिशय by टारझन
श्री छोटा
In reply to +१ by छोटा डॉन
श्री रा रा
In reply to +१ by छोटा डॉन
+१
In reply to अतिशय by टारझन
सिंहगड....
श्री
In reply to सिंहगड.... by प्रभाकर पेठकर
लेखापेक्ष
शक्तिमान-ज
In reply to लेखापेक्ष by शक्तिमान
श्री.
टुकुल-जी, त
In reply to श्री. by टुकुल
एखाद्या
श्री
In reply to एखाद्या by शाहरुख
छान आलेत फोटो . लेखहि सुंदर.
छान,
श्री
In reply to छान, by ज्ञानेश...
कुणीतरी
दुनिया