लेखकप्रासयांनी शनिवार, 12/03/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण साठच्या दशकात, काऊण्टर कल्चर, हिप्पी कल्चरच्या गदारोळात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज रत्ने हाती गवसली. त्यातलं महत्त्वाचं नाव , म्हणजे 'एरीक क्लॅपटन'. अत्युच्च प्रतीचा गीतकार, संगीतकार आणि गायक. जगातल्या सर्वात उत्तम गिटारवादकांपैकी एक.
लेखकउगा काहितरीचयांनी शनिवार, 12/03/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिपावर एक साधा सरळ प्रश्ण विचारला होता. आणि त्याचे तसेच उत्तर अपेक्षीत होते. पण मिपाकरांच्या सौजन्याने व कल्पकतेने हसता हसता पुरेवाट झाली.( धन्यवाद!) पण काही मिपाकरांनी आमच्या आयडी बद्दल काही शंका उपस्थित केल्या म्हणुन हा लेखनप्रपंच!!
मी ब-याच दिवसापासुन मिपाचा वाचक आहे पण पाहुना बनुन. ब-याच मराठी व भारतीय मानसाप्रमाने मलाही माझे काही विचार लोकांपर्यंत पोचावेत असे वाटते त्यामुळे व मिपावरचे उत्साही व एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण पाहुन मिपावर यायचे ठरवले. मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! पण (बहुदा) निलकांतच्या सहमतिने लवकरच सदस्य झालो.
लेखकगुंडोपंतयांनी बुधवार, 09/03/2011 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो,
उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच तेथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो उपक्रमावर दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते.
लेखकबहुगुणीयांनी बुधवार, 09/03/2011 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो.
लेखकमॅकयांनी मंगळवार, 08/03/2011 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
त्या ठिकाणची ही काही फुलझाडे.
बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे..
काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा....
०१)
०२)
लेखकगंगाधर मुटेयांनी सोमवार, 07/03/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?
जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही.
लेखकपिंगूयांनी शनिवार, 05/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली.
शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता.
लेखकमुक्तयांनी शनिवार, 05/03/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला.
कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं.
परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.