Skip to main content

प्रकटन

विहीर - माझ्या मनातील... (भाग दोन - शेवट्चा)

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 14/02/2011 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
----क्रमश.... मी हळूच पारावरून उठलो आणि खोल विहिरीत पाहू लागलो. त्यात असंख्य पिंपळाची पाण, घाण होती, कुठे हळूच काहीतरी हलत होत, आणि बारीकश्या लाटा उसळत होत्या, बऱ्याच पाननिवल्या इकडून तिकड भटकत होत्या, कोळ्यांची खूप जाळी, सगळीकडे पसरली होती, हे सगळ पाहत असताना, एक विचित्र भावना माझा थरकाप उडून गेली, कोणास ठाऊक का पण मला वाटत होत की त्या काळ्या पाण्यातून दोन डोळे माझ्याकडे रोखुण पाहतायत, ----क्रमश.... झटशीर मी मागे हटलो, अंगावर शहारा आला, डोक्याला मुंग्या आल्या, तसाच मागे सरून पुन्हा पारावर येऊन बसलो, थोडा शांत झालो.

कळी `खुलली' !...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/02/2011 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची उन्हं भंवतालच्या हिरवाईवर पसरली, तरी उमलूउमलू म्हणत गुलाबाच्या लालसर फांद्यांच्या टोकांवर झुलत राहिलेल्या कळ्या काल पाकळ्या मुडपून गुपचूप बसूनच होत्या... `फुलण्या'चं सार्थक व्हावं, म्हणून हुरहूरत होत्या... कळीत दडलेली पाकळीपाकळी मोहरली होती, पुरतं उमलून आपल्या देखण्या तारुण्याची भुरळ जगाला घालण्यासाठी उतावळी होती... त्यातच, तो काटेरी गुलाब, कळीआड दडलेल्या प्रत्येक पाकळीला दटावत होता. ... `एक दिवस थांबा... आजचा सूर्य मावळू द्या, उद्याचा सूर्य उगवेल, त्याची किरणं सोनेरी नसतील.. त्या किरणांचा स्पर्श झाला, की तुमची `कळी' आपोआपच खुलेल, पाकळीपाकळी मोहरून उठेल...

विहीर - माझ्या मनातील...

लेखक अज्ञात यांनी रविवार, 13/02/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांनी आज गावाला निघालोय... तशी माझी दर महिन्याला चक्कर असायची गावाकडं, पण मागचे ६ ते ७ महिने काही जमलच नाही, मलेरियाने आजारी होतो आणि नंतर बराच वेळ अशक्तपणामुळे किवा कामामुळे जमलच नाही गावी यायला... खूप दिवसांनी आता सवड मिळाली म्हणून म्हंटल गावाला चक्कर मारावी, म्हातारीची ख्याली खुशाली पुसावी म्हणून निघालो. आमच गाव तस खूप प्रसिद्ध अस नाही... कोलवडी त्याचा नाव, तिथे जायच म्हणजे मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असा करावा लागतो..

निरोप - तंबुला जसा दिसला!

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/02/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे.

वंडर बॉय

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 11/02/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी अधित..... ओळखलत का? सहा वर्षापुर्वी शाळेत तुमची भेट झाली होती. 'वंडर बॉय' चे बक्षिस तुमच्या हस्ते मिळाले होते. आज मी इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे. दोन वर्षापासुन मी एमबीए ची तयारी करतोय. अहमदाबाद मधे अ‍ॅडमिशन नक्की मिळेल. तुमचे ते 'कंपार्ट्मेंट' चे वाक्य आजही आठवते. मुख्याध्यपकांनी नंबर दिला. तुमचा एक सल्ला हवा आहे. दोन वर्ष नोकरी करावी का सरळ एमबी ए ला अ‍ॅडमिशन घ्यावी. वर्क एक्सपिरियन्स चा फायदा नक्कीच आहे. पण... आई बाबा दोघेही नोकरी म्हणताहेत. ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व काही दिले, आता स्वःत चे स्वतः बघ असे म्हणताहेत. एमबीए ला लागणारे पैसे मी देणार नाही असे बाबा म्हणताहेत. दहावीत पोस

फ्लाईट ९

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट ९ १९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते. फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते. आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले.