Skip to main content

शंका नको!

शनिवार, 12/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिपावर एक साधा सरळ प्रश्ण विचारला होता. आणि त्याचे तसेच उत्तर अपेक्षीत होते. पण मिपाकरांच्या सौजन्याने व कल्पकतेने हसता हसता पुरेवाट झाली.( धन्यवाद!) पण काही मिपाकरांनी आमच्या आयडी बद्दल काही शंका उपस्थित केल्या म्हणुन हा लेखनप्रपंच!! मी ब-याच दिवसापासुन मिपाचा वाचक आहे पण पाहुना बनुन. ब-याच मराठी व भारतीय मानसाप्रमाने मलाही माझे काही विचार लोकांपर्यंत पोचावेत असे वाटते त्यामुळे व मिपावरचे उत्साही व एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण पाहुन मिपावर यायचे ठरवले. मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! पण (बहुदा) निलकांतच्या सहमतिने लवकरच सदस्य झालो. मी एकाही मिपाकराला व्यक्तिगत रित्या ओळखत नाही पण ब-याच मिपाकरांना त्यांच्या लेखातुन प्रतिक्रीयेतुन ओळखतो. जसेकी गवी ,परा , डॉनराव ( छोटा) , इइ. यापुर्वी मी मिपावर कोणत्याच नावाने कोणत्याच प्रकारचे लिखान केलेले नाही. मिपावर कोन कोनाचा मित्र वा शत्रू (बहुदा नसनारच) याची कोणतीच कल्पना नाही . कोन कशाप्रकारची कंपुबाजी करतात याची पण कल्पना नाही .याअगोदर माझा कुठलाही मराठी ब्लॉग नाही . जे काही आहे ते येथेच आहे . तुम्हा सर्व रथी महारथी समोर मी एक साधा मराठी मानुस आहे हो . आत्तापर्यंत तर सांभाळुन घेतलच आहे पुढेही घेतालच!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3231
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

स्वागत आहे मिपा वर. प्रतिसादांकडे लक्ष देवू नका, तो एक जाहिरात बाजीचा प्रयत्न आहे. एक अपेक्षा: तुमच्याकडून चांगले लिखाण .

In reply to by नन्दादीप

एक अपेक्षा: तुमच्याकडून चांगले लिखाण .
अगदी सहमत आहे. उगाच 'माझे भिकारगड- उपास नगरी' सारखे बालवाडी निबंधमाला टायपातले काही लिखाण करू नका.

>>ब-याच मिपाकरांना त्यांच्या लेखातुन प्रतिक्रीयेतुन ओळखतो. हे सर्वसाधारण विधान आहे, की निरीक्षण आहे, की आपले जबरदस्त ज्ञान आहे की (गर्भित) धमकी?? ;) -सूर्यपुत्र.

मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! >>> . . मि तर १० मिनटात सदस्य झालो नविन काय म्हाइत नाय बॉ . आपन जुनेच आसाल आसा सशंय काहि जुनि लोक घेत आहेत ! त्यांना समप्रक उत्तर मिळाले नसेल कदचित प्रयन्त करुन बघा यश जरुर येईलच आपला नविन मित्र व नविन सभासद

In reply to by ईन्टरफेल

मि तर १० मिनटात सदस्य झालो.
मला तब्बल ४ महीने लागले. आय-डी रेजिस्टर झाला मे मध्ये पण सुरु झाला ऑगस्ट म्हैण्यात...

मिपावर कोन कोनाचा मित्र वा शत्रू (बहुदा नसनारच) याची कोणतीच कल्पना नाही . कोन कशाप्रकारची कंपुबाजी करतात याची पण कल्पना नाही
थोडे वैयक्तीक नीरीक्षणा द्वारे मार्गदर्शन करतोय पटलं तर घ्या न्हाय तर सोडून द्या.... इथे प्रमूख कंपू दोनच एक लेख लीहणारे त्यातले दूसरे प्रतीसाद लीहणारे त्यातले . लेख लीहणारे फार बूध्दीमान असतात व प्रतीसाद लीहणारे पण. परंतू या दोन वेग वेगळ्या क्रीया असल्याने फक्त लेख लीहणारे व फक्त प्रतीसाद लीहणारे यांना जो पर्यंत दोन्ही गोश्टीत (प्रतीसाद लीहणे व लेख लीहणे) पारंगता, नैपूण्य, ऊत्साह व आवड समान्पणे नीर्माण होत नाही तो पर्यात एकमेकां कडून एकमेकां ईरोधी मानले जाते. मूळातच लेखनाची प्रगल्भता व एंटरटेन्मेंट वाल्यू ही टी.आर.पी. च्या कोण्सेप्ट्वर प्रतीक्रीयांच्या संखेवर मोजली जाते. एकूणच प्रश्नोत्तर व प्रतीक्रीयांच्या कार्यक्रमात जेव्हा नवखे लोक एखाद्या आय्डीचा पहील्याच दीवशी समाचार घेतात, कंपूबाजांच्या राखीव कूरणात प्रवेश करतात अथवा इतर अनेक कारणांनी कोणाचा इगो दूखावला गेला की मग समोरच्याला जेरीस आणण्यासाठी त्याचे वीडंबन करणे, त्याचा अपमान करणे, त्याचे धागे हाय्जॅक कर्णे अथवा वाळीत टाकणे या व इतर प्रकारे कंपूबाजी ला रान मोकळे करतात. बहूतांश कंपूबाज हा समोरचा व्यक्ती हाअ दूसर्‍या कंपूला सामील आहे हे ऊघड वा मनातल्या मनात बोलून तसा स्पश्ट वा अस्पश्ट प्रचार करतात. तसेच आपल्या सार्ख्या सामन्य मराठी माणसाच्या मनात जेव्हा रथी महारथीची भीती ऊप्तन्न होऊन असले "आत्तापर्यंत तर सांभाळुन घेतलच आहे पुढेही घेतालच!!!" वीनवणारे धागे नीघणे हे सूध्दा अप्रत्यक्षपणे कंपूबाजीला प्रोत्साहन देत असते. कंपूबाजी न करता मिपावर सरवायव कसे व्हायचे व तरीसोध्दा लोकांना आपलेसे कसे करायचे याचा वीचार केलात तर एक आप्णाला सोशल नेटवर्कींग छाण जमले पाहीजे... थोडक्या जे आपल्याला प्रापंचीक कारणाने प्रत्यक्ष जगात करावेच लागते.... म्हणजे तू मला मोठ म्हण मी तूला मोठं म्हणतो अथवा इतर प्रकार. कीव्हा दूसरा पर्याय म्हणजे इथले बरेच लोक "मिपा पडीक" या सदरात मोडणारे असल्याने त्यांना सतत कोण तरी हसवीणारा ऊपलब्ध होणे फार्फार आवडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण जेव्हडे वीचार पूर्वक लेखन टाळाल व वीनोद रसाला प्राधान्य द्याल तेव्हडे इथे वीना वीरोध रथी महारथीं सोबत ऊभे रहाल. जर काही सीरीयस लीहायचे असेलच तर आधी आपण दर्जेदार वीनोदी लेखन लीहण्यास समर्थ आहात असे सीध्द केलेत तर चेंज म्हणून आपल्या गंभीर वीशयाला डोक्यावर नक्कीच घेतले जाइल पण तसे नसेल तर मात्र त्याची खात्री देता येतच नाही. अवांतर - मिपा वर जो व्यक्ती सर्वप्रथम आपल्या शूध्दलेखनावर तीव्र हल्ला चडवेल त्या पासून कंपूबाजीचे सर्वधोके स्कॅन करूनच व्यवहार करा. ज्या प्रमाणे सी.आय. ए. , के.जी.बी. आय.एस.आय., मोसाद वा तत्सम संघटणा अपल्या शत्रूंवीरूध्द आपल्या कारवाया अत्यंत गोपनीय व सूसूत्रतेने करत असतात तशाच काही मोहीमा या मिपा करांच्या व्यनीमधून शीस्तबध्दपणे होत असल्याचे आरोप वा नीरीक्षण पूर्वी काही लेखांमधे वाचण्यात आले होतेचे ऐकीवात आहे पण अर्थातच या गोश्टी भारतीय न्याय संस्थेच्या हस्तक्षेपा शीवाय ऊघडकीला आणने शक्य नसल्याने याबाबत खोलात जाऊन पूरावे मिळवणे अशक्य असते. पण एक ऊघड गूपीत म्हणून बहूतांश मीपाकर या प्रकाराला ओळख देतात.