Skip to main content

प्रकटन

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

पहिला पाऊस..

लेखक वैशाली . यांनी मंगळवार, 12/04/2011 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज ह्या वर्षाचा तुला भेटल्या-नंतरचा पहिला पाऊस.. बघना कसा छळतो.. तुझी आठवण ह्या मनात मेघांसारखी दाटून आणतो.. तुझी सोबत सुटल्याच्या वास्तविकतेला, डोळ्यातून पाणी म्हणून बरसण्यास भाग पाडतो.. मग मीही साथ देते त्याला.. मी अन तो पाऊस.. आता एकत्र बरसतो.. अन सोबतीला... तुझी आठवण !! उगीच काही थेंब तो शिंपडतो माझ्यावर.. जणू तुझ्याच स्पर्शाची ती जाणीव.. मोहरते मी.. कधी नुसतीच बहरते.. तुझ्या स्वाधीन व्हायला तयार.. सर्वस्वी.. नाही.. तुझ्या आठवणींच्याच म्हण की .. तू नसतोस..

सांगे वडिलांची किर्ती.....

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे घराणे सरदार घराणे. अस्सल. भेसळ? ह्या. चालणारच नाही महाराजा.एकदम खानदानी. पेटारेच्या पेटारे भरुन सोने होते. मोठ्ठं कुळ. जिकडे नजर जाईल तिकडे जमीन आमचीच. आणि घरचे लोक तर काय एकाहून एक हुस्शार... सगळीकडे आमचाच बोलबाला होता. दुध दुभते भरपूर. आमच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या, बुद्धीमत्तेच्या गाथा सांगितल्या जात एकेकाळी..... पण म्हणतात ना.... साली दृष्ट लागली हो सगळ्याला. सग्गळं सग्गळं गेलं. चोरांनी लुटलं, ठगांनी फसवलं, काही अजाणतेपणी गेलं अन काही जाणतेपणी. आता आमचे लोक करतात चाकरी कुणाच्या हाताखाली. कुणाचा व्यवसाय गोळ्याबिस्किटांचा. कुणाचा फ्लॅट आहे शहरात दोन बेडरूमचा.

उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 10/04/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.

अगम्य

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 09/04/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो. ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो.

शीर्षक नसलेली सत्यकथा!!

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 06/04/2011 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस..... मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो... नेहमीचीच कामं! काही सहकार्‍यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली..... आता दिवस मोकळा.... पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!! "ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला.... "हॅलो:....", मी "हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट.... "हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम!