एडसचा जीवघेणा पाश
ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली.
ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो.
मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो.
मिसळपाव