Skip to main content

प्रकटन

लिहिण्यास कारण की -

लेखक विदेश यांनी सोमवार, 09/05/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे?

मायेची सावली

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 05/05/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
ल हानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्याचं एक विशेष आकर्षण असायचं. आंब्या-फणसाचा यथेच्छ आस्वाद, नदीतली आंघोळ, मनसोक्त भटकंती आणि आजीचं प्रेम! आमच्या लहानपणी सुटीत कुलू-मनाली, नैनिताल-दार्जिलिंग, गीर-कान्हा, गेला बाजार महाबळेश्‍वर, असं कुठे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. किंबहुना, तसा विचारही कधी मनात यायचा नाही. पर्यटन म्हणजे लग्ना-मुंजीच्या निमित्तानं मुंबई-पुणे किंवा कोल्हापूरला केलेला दौरा. येता-जाता कुणाची गाडी असेल किंवा अगदीच सोयीचं असेल, तर एखाद्या ठिकाणाचं दर्शन.

कँडिडेट्स मॅचेस - २०११

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/05/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत. २०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे. आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू?