Skip to main content

प्रकटन

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

प्रगतीच्या दाराआड

लेखक रमताराम यांनी सोमवार, 18/04/2011 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज NDTV वर हादरवून टाकणारा हा रिपोर्ट पाहिला. दिल्लीच्या इंडिया गेट पासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीच्या - खरे तर शहराच्या - दारूण अवस्थेकडे पाहून हादरून गेलो. तब्बल १० लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची अवस्था काय आहे हे स्वतःच पहा.

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 17/04/2011 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/04/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips) संदर्भ: http://www.misalpav.com/node/17667 http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms १. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.) २.

असाच अजुन एक प्रवास !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 17/04/2011 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
पोरीच्या इवल्या इवल्या डोळ्यांनी जाऊ नका जाऊ नका म्हणत असताना जड पाऊलांनी निरोप घेऊन टॅक्सी एअर-पोर्ट कधी निघाली. तोच रस्ता , तीच वळण तेच सोपस्कार पार पाडून विमानात स्थिरवलो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत मनातील निराशा हळु हळु वाढु लागली होती. ढगांचे काळे-पांढरे पुंजके जितके घट्ट होत होते तितकेच मनातील निराशेचे ढग दाटले होते. अधून-मधून जमिनीवरचे पाण्यचे तलाव डोळ्यात कवडसे खुपसत होते. जे खर तर सुंदर दिसायला हव होत तेच खुपत होत. कसला कंटाळा आला आहे , कसली निराशा आहे हेच कळेना.

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/04/2011 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!! आदरणीय अण्णा, आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली.

जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 13/04/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज १३ एप्रिल. ९२ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत.

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.