परवा लेक घरात शिरली ती एक प्रश्न मनात घेऊनच.
“आई, हवा कुठल्या रंगाची असते?” इति लेक.
“अगं हवेला रंग नसतो.” तिच्या बाला सुलभ प्रश्नाच बायकोने निरसन केल.
“हरलीस?”
“?”
“अग हवेचा रंग गुलाबी असतो.” लेकीने तारा तोडला.
आताशी बायकोच्या भूवयांच धनुष्य झाल होतं.
“ते गाणं नाहीये कां ‘ही गुलाबी हवाऽऽऽऽऽऽ वेड लावी जीवाऽऽऽऽऽऽ’ येव्हाना लेकीने तालही धरला होता.
मग एकदम खिदळली आणि म्हणाली “अग आई, पीजे होता”.
“पण आई खरंच गुलाबी हवा म्हणजे काय?”
बायकोचा छोटा पॉज.
“कसला विंचार करतेयस आई.”
“मोठ्या माणसांना वेगळ्या शब्दांत सांगाव लागत. लहान मुलांना साध्या सोप्प्या शब्दांत समजेल अस सांगाव लागत.