कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता.
अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ?
मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ?
तो म्हणाला - अरे सहजचं.
आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची.
थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला.