Skip to main content

प्रकटन

नाती-गोची २

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 20/01/2012 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
"एन्हॅन्स्ड सेन्सिबिलिटीज म्हणजे काय रे"? कुठे ऐकलास हा शब्द? (पल्याडचे लेख वाचायला लागली की काय?) "आंघोळीला गेला होतास. फोन सारखा वाजत होता म्हणुन उचलला. मी हॅलो म्हणायच्या आधीच त्या बै ३ मिनीटे बोलत होत्या". हा शब्द वापरणार्‍या ना बै नाही म्हणायच. मॅम म्हणायच. "मॅडम मधला ड चे काय"? ते मॉडर्न आहे तुला नाय समजायच. "नाही तर नाही. मला अर्थ सांग". जाणीवांच्या विस्तारलेल्या कक्षा. "अगो बाई. विस्तारलेल्या कक्षा मधे अक्षरे खातात की काय? तो फोन कर.

लहानपणीच्या गोष्टी

लेखक तिमा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय कधीच नव्हता. शाळेमधे परसेंटेज व नंबर खाली यायचा तो याच विषयामुळे. त्यातून मोठ्या बहिणी त्याच शाळेत असल्यामुळे तर मला चांगलीच बोलणी बसायची. त्या दोघींची चित्रकला अप्रतिम होती, अगदी बोर्डावर त्यांची चित्रे लावली जात. मला मात्र माणसाची फिगर अजिबातच जमत नसे. तशी इतरांची सुंदर्, सुंदर चित्रे बघायला मला खूपच आवडत. पण मला येत नसलेली कला, अशी मारुन मुटकून कशी येणार हे समजत नसे. वर्गात ३/१० मार्क मिळवणारा मी घरुन काढून आणलेल्या चित्रांना मात्र ९/१० मिळवत असे. पण ते मार्कस देताना चित्रकला शिक्षक, छदमीपणे हंसून, बहिणीने काढलेलं ओळखताय हं गाढवा!

माझा निबंध.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 19/01/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही?

नाती गोची

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 17/01/2012 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या कुठे आहेस"? विरार, का ग? "अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे". किती वाजता? "आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे" येउन पोचतो. पण तु आधी जा. "गिफ्ट काय घेउ"? मला माहीत नाही. "अरे सुचव ना" घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ. "शी. साठाव्या वाढदिवसाला दारु" मग तुला काय आवडते ते दे. "येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"? पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी.

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/01/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.

जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 16/01/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्‍या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्‍यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?!

कोर्टटिपा..

लेखक गवि यांनी सोमवार, 16/01/2012 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्‍या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं. मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते.. भिंतीवरची गांधीजी, गांधारी बनून हातात तराजू धरुन ताटकळणारी न्यायदेवता आणि सईदजाफरीछाप न्यायाधीश हे निकाल लावण्यासाठी पूर्ण सक्षम आहेतच.. पण तरीही..

टेकन....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 16/01/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
तूमची वयात आलेली मुलगी , तुमचे ऐकत नसेल तर तिला हा सिनेमा जरूर दाखवा.....(तिला एक्टिलाच बघू दे ही माझी विनन्ती.....काही द्रुश्ये adult आहेत...पण ती कथेला पुरक आहेत.....) खरे तर मी एवढे एकच वाक्य लिहिणार होतो....पण "वल्ली" ह्यानी सान्गीतल्या प्रमाणे, थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो... एक माणुस असतो. तो धन्देवाइक शरीर रक्शक असतो. त्याचा घट्स्फोट झालेला असतो. ...त्याची मूलगी तिच्या मैत्रीणी बरोबर Paris ला जायचा बेत आखते....तिचा रूट बघुन ह्याचा नकार्....पण मुलगी म्हणते .....की ती वेळोवेळी फोन करेल.....पण तिचा फोन येत नाही....मग हाच फोन करतो...नेमके त्याच वेळेस तिचे अपहरण होत अस्ते....ह्याच्