Skip to main content

प्रकटन

चवदार तळे सत्याग्रह - ८५ वर्ष पूर्ण..

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 20/03/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते. आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत.. -- कॉमॅ.

भिगवन

लेखक jaypal यांनी सोमवार, 19/03/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

द स्पिरिट ...

लेखक गवि यांनी बुधवार, 14/03/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचा भाग: झुईं.. राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं... नव्या तंत्राचा पहिला उपयोग आपण माणसं ज्यासाठी करतो त्यासाठी, अर्थात युद्धासाठी, विमानाचा वापर शोध लागताक्षणीच सुरु झाला.

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.

पुन्हा सालं 'वैचारिक'

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

मिडलाईफ क्रायसिस

लेखक शुचि यांनी सोमवार, 12/03/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भुलवतात, आकर्षक वाटतात. आता लहानपणीच पहा ना, असं मूल क्वचितच सापडेल ज्याला फुलपंखी पर्‍या, राजपुत्र-राजकन्या, आगीच्या ज्वाळा ओकणारे , आकाशात संचार करणारे ड्रॅगन यांनी मोहविले नसेल. त्याच लहान मुला/मुलीने जरा तारुण्यात पदार्पण केले की वसंतोत्सव, बहाराचा काळ सुरु होतो.ज्या ड्रॅगनची भीती लहानपणी वाटत असते तोच ड्रॅगन जिंकावासा वाटू लागतो. "Evoke the fire within" अशा धाडसी वृत्तीचा वाटून खुणावू लागतो.

जॉय मुखर्जींना विनम्र अभिवादन..!

लेखक कॉमन मॅन यांनी शनिवार, 10/03/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अतिशय आवडते सिनेकलावंत जॉय मुखर्जी यांना काल देवाज्ञा झाली. १९६० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांतून चांगली कामे केली. त्यांना गाणीही खूप छान मिळाली. त्यांच्यावर आणि साधनावर चित्रित झालेले 'आप यू ही अगर हमसे मिलते रहे..' हे खूप छान गाणे आत्ता आम्हाला या निमित्ताने आठवत आहे. जॉय मुखर्जींच्या आत्म्यास सद्गती मिळावी, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.. -- कॉमॅ.