Skip to main content

प्रकटन

डॉ. संजय ओक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 07/04/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

उभ्या उभ्या विनोद.

लेखक रेवती यांनी गुरुवार, 05/04/2012 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपला मिपाकर मित्र संदीप चित्रेची इमेल आली. त्यात तो आणि त्याचे मित्रमंडळ शिकागो महाराष्ट्र मंडळासाठी 'उभ्या उभ्या विनोद' (उउवि) हा कार्यक्रम सादर करणार असल्याबद्दल लिहिले होते. निमित्त होते गुढी पाडव्याचे. ३१ मार्चच्या कार्यक्रमाला जाण्याचे नक्की करून आम्ही ऑनलाईन नावनोंदणी केली. ते ठिकाण आमच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर वॉरनव्हिल येथे होते. संदीपचा कार्यक्रम बघायला मिळणार होता, शिवाय त्याला व्य. नि. करून आमच्याबरोबर घरी येण्याचे आमंत्रण दिले.

हिताची निगा किती करावी?

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
. हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे. . हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.

अष्टभूजा...की....अष्टावधानी की....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 03/04/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो... घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला.. दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले... एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम...

आपले बुवा बरे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 02/04/2012 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रच आता मित्रांचा खून करतात आणि वर खंडणी पण घेतात... आपले मित्र अजून पण टिकून आहेत.. मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... बायकोने प्रियकराला हाताशी धरले आणि नवऱ्याला ठार मारले आपली बायको मात्र अजून पण रात्री २ पर्यंत जेवायला थांबते.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... मुलाने केला आईचा खून कारण आला दारू पिवून.. माझी मुले काही असे करत नाहीत कारण ती अद्याप लहान आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... भाजीचे हे भाव वाढले, सरकारने पण हात टेकले... आपण काही भारतात नोकरी करत नाही शेजारी उपाशी राहिला तरी आपल्याला फरक पडत नाही.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... असते खूपच

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी रविवार, 01/04/2012 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.

एक पद्धत..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे मरणाची बातमी देणार्‍या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात.. पोस्टकार्डंच कुठे राहिली आता.. सगळीकडे ईमेल.. अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात.. आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत.. खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..? मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही... अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही .. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात .. सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही..

ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.

दु:खचा महाकवी ग्रेस

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत काव्य प्रकारात विपुल साहित्या निर्मिती झाली आहे. गेली २०-२५ वर्षात जे कवी झाले किंवा आधीपासून होते त्यांना आपण ढोबळ मानाने २ प्रकारात वीभागु शकतो. एक मुख्य प्रवाहातले आणि दुसरे मुख्य प्रवाहातून वेगळे असलेले. या दुसर्‍या प्रकारच्या कवींना फार प्रसिद्धी लाभली नाही पण जे त्यांचे चाहते आहेत ते अत्यंत निस्सीम आणि निष्ठावान चाहते आणि रसिक आहेत.