Skip to main content

प्रकटन

माझे ब्रह्मज्ञान

लेखक यकु यांनी शनिवार, 28/04/2012 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

पाटलांचे सेतुबंधन

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 26/04/2012 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मराठीत खास वल्ली लोकांना त्यांच्या स्वभाव आणि कर्तबगारी नुसार हमखास विशिष्ट विशेषणे मिळालेले आपण पाहतो. अगदी पंचयतीच्या निवडणूकीत पडलेले आमचे लोकनेते मा ना रा रा श्री शरदचंद्रजी शिंदे-पटिलसाहेब यांच्यासारख्या मान्यवर मंडळी पासून ते गल्लीतल्या बेरक्या बबन्या पर्यंत. अशीच एक वल्ली म्हणजे आमच्या गावचा मुकुंदा. "लय भारी गाडी" हे बिरूद त्याला तसं कोवळ्या वयातच मिळालं होतं. पुढं शिकून पुण्यात नोकरीला लागल्यावर त्याला "अगदी हरहुन्नरी व्यक्तिमत्व बरं का हो" अशी पदवी आपसूकच मिळाली होती. आणि आता त्याला इथे अंग्लदेशात versatile, multifaceted, अशा काही-बाही विशेषणांनी संबोधलं जातं.

ज्यु. अर्धवटराव

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 26/04/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा. मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते.

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 25/04/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल) त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत. फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे.

War Horse

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 25/04/2012 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस मध्ये खितपत पडणारी bandwidth नेहमीच मला बघवत नाही, त्यातूनच ती सत्कारणी लागावी अशी माझी मनोमन इच्छा असते, मग काहीतरी साधारण काहीतरी point असणारी चित्रपटांची नाव यादीतून शोधून ती डाऊनलोड करतो. काहीवेळा अपेक्षाभंग होतो तर काहीवेळा खरंच त्या वेळेचे चीज होते. त्यातूनच "war horse" चित्रपट आंतरजालावरून लॅपटॉपवर उतरवण्यात आला. तो बघितला , आणि वाटलं की मिपाकरांसमोर हा चित्रपट उलगडावा. प्लॉट सांगण्याअगोदर चित्रपटाची थोडी पार्श्वभूमी सांगतो.

नशिक -पुणे प्रवास एक मस्त(?) अनुभव

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 22/04/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो , परवा काही कामानिमीत्त नाशिक वरुन पुण्याला येण झालं, त्याचा हा वृत्तांत .... प्रवास म्हणल की कधी कधी कंटाळवाना असतो तर कधी कधी एखादा मस्त अनुभव देउन जातो.तुम्ही कुठ आणी कोणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं. असो,बरच विषयांतर झालं ,मुळ मुद्यावर येतो ,नमनालाच घडीभर तेल नको घालायला. पुण्यात लवकर पोहचायचं म्हणून पहाटे ४ वाजता चा मोबाइल मधे अलार्म लावला होता,तरी आवरता आवरता ६वाजले मग घरी नाष्टा करायचा विचार बाजुला सारला आणी गाडी काढली ,५ मिनीटाच्या आत हायवे ला लागलो, अर्थातच सकाळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती ,एप्रील चा महीन