आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात. त्यापैकी काही चित्रकार, काही सैनिक, काही डॉ., काही संगीतकार, तर काही गायकही असतात.काही तुमच्या आमच्या सारखी सामान्यही असतात.
ह्या शिवाय काही दुर्दैवी जीव म्हणजे, अपंग, अंध किंवा मतिमंद असतात.
समाजाचे असेच एक दुर्दैव अंग म्हणजे...व्यसनी माणसे...
आपल्या समाजाच्या दुर्दैवाने, व्यसनी माणसा विषयी, त्याच्या अपरोक्ष फार चांगले बोलल्या जात नाही.त्याला मदतही केल्या जात नाही.तुलनेने सिगरेट्,तंबाखू,दारु,पान आणि विडी ह्यांच्या अधिन झालेल्या माणसांविषयी समाज जास्त बोलत नाही.(समाजाने ही व्यसने, जवळपास स्वीकारलेली आहेत, असेही म्हणता येईल.)खरेतर ह्या व्यसनांच्या अधिन झालेली माणसे पण मदतीच्या अपेक्षेत असतात.
असेच एक समाजाचे दुर्दैवी अंग म्हणजे, गांजेकस,चरसी आणि गर्दुल्ले.
तुषार नातू हा, असाच एक गर्दच्या विळख्यात सापडलेला मनुष्य.
ह्या जीवघेण्या व्यसनातून तर ते बाहेर पडलेच पण त्या शिवाय हे व्यसनच नाही, तर प्रत्येक भारतीय हा निर्व्यसनीच हवा, ह्या ध्येयाने पछाडून त्यांनी "मैत्री" नावांच्या संस्थेत स्वयंसेवक ते समुपदेशक असा दैदीप्यमान प्रवास केला.
गेली ७/८ वर्षे ते पुर्णतः निर्व्यसनी आहेत.त्यांचा ब्लॉग वाचत असतांना, त्यांची आणि माझी ओळख झाली.माझ्या शंकांना आणि माझ्या मैत्रीच्या पुढाकाराला, त्यांनी कधीच नाही म्हटले नाही.
माझ्या ह्या मित्राचे स्वानुभवावरती आधारलेले, नशायात्रा ह्या नावांचे, पुस्तक नुकतेच बाजारांत आले आहे.
मला ज्या गोष्टी अजिबात जमत नाहीत, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे, पुस्तक परीक्षण.
म्हणून मी श्री. तुषार नातू ह्यांना विनंती केली की, त्यांनी त्यांच्या पुस्तकातील, त्यांना आवडलेला , एखादा भाग मला पाठवावा.फेसबूक वर त्यांनी मला तो भाग पाठवला.तोच भाग मी कॉपी-पेस्ट करून खाली देत आहे.
=================================================================
माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय. एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे .गांजाचे शारीरिक दुष्परिणाम फारसे वेगाने किवा गंभीर होत नाहीत मात्र त्याचा माणसाच्या मेंदूवर खूप भयानक परिणाम होऊ शकतो , गांजा पिऊन पुढे वेड लागलेले अनेक जण मला माहित आहेत . जँकी च्या बाबतीत माझे प्रयोग फक्त गांजा वरच थांबले नाहीत तर पुढे मी ब्राऊन शुगर ओढायला सुरवात केल्यावर जँकी ला ब्राऊन शुगर चा धूर देखील दिला होता व त्यातून भयंकर गंभीर प्रकरण उदभवले होते.
झाले असे की अधून मधून म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा मी जँकी ला माझ्या बरोबर संडासात नेऊन त्याच्या तोंडात गांजाचा धूर सोडत असे , नंतर जेव्हा मी ब्राऊन शुगर ओढायला लागलो तेव्हा देखील मला तो प्रयोग पुन्हा जँकी वर करावा असे वाटले व मी ब्राऊन शुगर चा तोंडातील धूर जँकी च्या तोंडात सोडला आता त्याला माझ्या अश्या वागण्याची सवय झाली होती त्या मुळे त्याला फारसे आश्चर्य वाटले नसावे किवा त्याने अविश्वास देखील दर्शवला नाही , ब्राऊन शुगर ही अफू वर रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली पावडर असल्याने त्यातील अफू चे गुणधर्म अफुच्या साधारण पाचपट जास्त परिणाम कारक असतात एक प्रकारे अफूचा अर्कच असते ही पावडर याचे व्यसन अतिशय वेगाने लागते व हे व्यसन मिळाले नाही तर दारू व गांजाच्या पेक्ष्या खूप जास्ती शारीरिक त्रास होतात ( विथड्रॉवल्स ) मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते त्यामुळे घरात चोऱ्या करणे , बाहेर उधारी करणे , ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरु झाले होते.
जँकी ला देखील मी जेव्हा चार पाच वेळा ब्राऊन शुगर चा धूर दिला तेव्हा त्याला देखील त्याचे व्यसन लागल्याचे मला जाणवू लागले होते कारण मी संडासात गेलो की तो बाहेरून माझ्यावर भुंकणे सुरु करत असे म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याला देखील मी आत घ्यावे . माझ्या कडे जेव्हा जास्त पैसे असत व पुरेशी ब्राऊन शुगर असे तेव्हा मी त्याला आत घेऊन ब्राऊन शुगर चा धूर त्याच्या तोंडात सोडत असे , मात्र जेव्हा माझ्या कडे कमी ब्राऊन शुगर असे व माझा मुड ठीक नसे तेव्हा मी त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करीत असे . मला हे जाणवत होते की माझ्या प्रमाणेच जँकी ला देखील ब्राऊन शुगर मिळाली नाही तर शारीरिक त्रास होत असावा व म्हणून तो जिवाच्या आकांताने बाहेरून भुंकून मला देखील दे अशी विनंती करत असावा पण जँकी त्या बाबतीत सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असल्याने त्याचा नाईलाज होता म्हणजे मी जर कृपा केली तरच त्याला ब्राऊन शुगर चा धूर मिळत असे . सुरवातीला गांजामुळे वाढलेली जँकी ची भूक नंतर ब्राऊन शुगर मुळे मंदावली होती व तो जरा सुस्त होत चालला होता हे स्पष्ट बदल मी मनात नोंद केले होते.
माझा मोठा भाऊ नुकताच त्याचे पुण्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून पुन्हा घरी आला होता , त्याला बाहेरून माझे सगळे प्रताप समजले होते व तो एकदोन वेळा माझ्याशी माझ्या व्यसनाबाबत बोलला देखील होता पण मी त्याला उडवून लावले होते . माझा मोठा भाऊ स्वभावाने शांत , सालस प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याला माझे वागणे पटत नव्हते तरी तो माझ्याशी भांडण वगैरे करीत नसे शिवाय मी किती बंडखोर आहे व बाहेर कोणकोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरतो हे त्याला माहित होते , माझा रागीट स्वभाव , हाणामारीला तत्पर असणे या गोष्टींमुळे तो शक्यतो माझ्या बाबतीत बोलणे टाळत असे . एकदा सकाळ पासून मला जरा पैश्यांची चणचण होती त्यामुळे मी वैतागात होतो , सकाळी आईला कुठेतरी समारंभाला बाहेर जायचे होते म्हणून ती लवकर घराबाहेर पडली होती , तिच्या कडून जाताना पैसे घेतले होते पण ते माझ्या व्यसनासाठी पुरेसे नव्हते , मी साधारणतः सकाळी ९ घराबाहेर पडलो होतो अड्ड्यावर गेल्यावर समजले की आदल्या दिवशी पोलिसांची रेड पडली होती आणि त्यामुळे ब्राऊन शुगर मिळणे बंद होते.
हे एकून माझे हातपायच गळाले , तेथे अड्ड्यावर माझ्या सारखे बरेच गर्दुल्ले घोळक्याने उभे होते , एका ठिकाणी मिळत नाही म्हंटल्यावर मग दुसरीकडे कोठे मिळते का याची एकमेकांना विचारणा होत होती एकाने सांगितले की नाशिक शहरात भद्रकाली मध्ये माल ( ब्राऊन शुगर ) मिळतो आहे . ज्यांच्या कडे जास्त पैसे होते ते ताबडतोब बस आणि रिक्षा करून भद्रकाली कडे रवाना झाले , माझ्या कडे जेमतेम पैसे असल्याने माझी अडचण होती नाशिक ' भद्रकाली ' ला बसने जाणे येणे आणि ब्राऊन शुगर खरेदी करणे या साठी पुरेसे पैसे नव्हते फार तर एका वेळचे म्हणजे जाण्याचे किवा येण्याचे पैसे होते , शेवटी येताना पायी येऊ असा निर्धार करून बसने भद्रकाली ला गेलो तेथे ब्राऊन शुगर मिळण्यासाठी बराच वेळ लागला इकडे विड्रॉवल्स मुळे माझा जीव कासावीस झाला होता , शेवटी एकदाची पुडी मिळाली व मी तेथेच आडोश्याला तीनचार दम मारून आधी मला होणारा त्रास थांबविला व मग घरी यायला निघालो भद्रकाली ते नाशिक रोड रेल्वे क्वार्टर्स हे अंतर सुमारे ९ किलोमीटर असावे येताना भाड्यासाठी पैसे नव्हते म्हणून भर उन्हात मी पायी येण्यास निघालो . सुमारे अडीच तास पायी चालून मी घरी आलो घरात मोठा भाऊ होता फक्त , वडील कामावर गेले होते दुपारचे ३ वाजले होते मी घरात आल्याबरोबर सरळ संडासात शिरलो व उरलेली ब्राऊन शुगर ओढण्यास सुरवात केली.
मी घरात आल्याबरोबर जँकी माझ्या मागे पुढे घोटाळू लागला होता पण त्याच्या कडे मी सरळ दुर्लक्ष केले होते. मी संडासात गेल्यावर त्याने भुंकणे सुरु केले याचा अर्थ ' मला पण हवे ' हा होता हे आता मला माहित झाले होते . त्या दिवशी मी सकाळ पासून पनवती लागल्यासारखा फिरलो होतो , वर पैश्यांची अडचण त्यामुळे डोके फिरले होतेच , मी जँकी च्या भुंकण्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही जमेना जेमतेम माझ्यापुरती ब्राऊन शुगर असताना मी जँकी ला त्यात सहभागी करून घेणे शक्यच नव्हते.
एकीकडे त्यांच्या भुंकण्यामुळे माझे लक्ष पिण्यात नीट लागत नव्हते व मला जँकीचा राग येऊ लागला होता . शेवटी मी वैतागून बाहेर आलो आणि त्याच्या पेकाटात दोन लाथा घातल्या त्याला हे अनपेक्षित होते तो मोठ्याने विव्हळू लागला तितक्यात माझा मोठा भाऊ तेथे आला त्याने मी जँकी ला मारलेले पहिले व मला तो रागावू लागला ' का मारतोस त्या गरीब जीवाला ? कसला राग काढतो आहेस त्यांच्यावर वगैरे बोलू लागला " मी मुजोर होतोच सुरवातीपासूनच मी देखील ''माझा कुत्रा आहे तो , मी आणला आहे त्याचे हवे ते करीन , तू कोण मध्ये बोलणारा म्हणून भावाशी वाद करु लागलो " शेवटी वैतागून भाऊ म्हणाला '"किती त्रास देशील सर्वाना ? तू सर्व लाजलज्जा सोडली आहेस , इतका निर्लज्ज मुलगा मी कधी पहिला नाही , एखादा असता तर आपल्या मुळे इतका त्रास होतोय घरच्यांना म्हणून सरळ जीव तिला असता रेल्वे खाली , तसाही तुझा जगुन काही फायदा नाही " असे त्याने म्हणताच माझे डोके फिरले थांब मला मर म्हणतोस ना बघ आता मरतोच मी , असे म्हणून मी रागाने दुसऱ्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले.
=================================================================
वाचने
17046
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्न !!!
वाचावंच लागेलसं दिसतंय.
बाप रे..
सहमत
In reply to बाप रे.. by बोबो
. व्यसन म्हणजे "स्वत: विकत
+१
In reply to . व्यसन म्हणजे "स्वत: विकत by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to +१ by किसन शिंदे
शिंदे साहेब
In reply to +१ by किसन शिंदे
केवळ गैरसमज !
In reply to +१ by किसन शिंदे
+११
In reply to +१ by किसन शिंदे
आणि
In reply to +११ by प्रसाद गोडबोले
बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य
In reply to +११ by प्रसाद गोडबोले
बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही
सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.सामान्यतः गाढव दारु देखील पीत
In reply to बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य by मृत्युन्जय
मेलो ....
In reply to सामान्यतः गाढव दारु देखील पीत by गवि
(No subject)
In reply to सामान्यतः गाढव दारु देखील पीत by गवि
+१
In reply to सामान्यतः गाढव दारु देखील पीत by गवि
गाढव
In reply to +१ by बॅटमॅन
नको, तेवढी समज त्या वयातही
In reply to गाढव by सुनील
गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर
In reply to +१ by बॅटमॅन
हा हा हा
In reply to गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर by शिद
च्यामारी पण तुला गाढवाला हात
In reply to +१ by बॅटमॅन
पुढेही नाही गेलो म्हणा
In reply to च्यामारी पण तुला गाढवाला हात by मृत्युन्जय
च्यामारी पण तुला गाढवाला हात
In reply to च्यामारी पण तुला गाढवाला हात by मृत्युन्जय
बॅचलर
In reply to च्यामारी पण तुला गाढवाला हात by बॅटमॅन
कल्पना नाही ओ. मंगळसूत्र
In reply to बॅचलर by वॉल्टर व्हाईट
वाचावेच लागेल.
भयानक व्यसन आहे हे.
मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल
पुस्तकाची ओळख करून
तुषार नातु यांचे सर्वलेखन
लोकसत्तामधिल पुस्तक परिचय
धन्यवाद मुवि
!!!
परिचय छान पण !
शुद्धलेखन कसले ह्यांत?
In reply to परिचय छान पण ! by धर्मराजमुटके
ना की अशुद्ध भाषा ?
In reply to शुद्धलेखन कसले ह्यांत? by प्रचेतस
एखाद्या कथेतले संवाद त्या
In reply to ना की अशुद्ध भाषा ? by धर्मराजमुटके
श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.
In reply to एखाद्या कथेतले संवाद त्या by प्रचेतस
सहमत
In reply to श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा. by धर्मराजमुटके
चूज युवर पॉईझन
या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि
In reply to चूज युवर पॉईझन by प्रसाद गोडबोले
करेक्ट
In reply to या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि by गवि
आमचाही एक अनुभव
सख्या मामीचा सख्खा पुतण्या
In reply to आमचाही एक अनुभव by चौकटराजा
स्वारी ....
In reply to सख्या मामीचा सख्खा पुतण्या by मृत्युन्जय
चौरा साहेब,
In reply to आमचाही एक अनुभव by चौकटराजा
मी घेतलेला अनुभव
In reply to चौरा साहेब, by सुबोध खरे
आणि मग
यावर एक उपाय ...
In reply to आणि मग by प्रसाद गोडबोले
वाह
In reply to यावर एक उपाय ... by चौकटराजा
व्यसन म्हणजे "स्वत: विकत
परिचयाबद्दल धन्यवाद, मुवि.
पुस्तक...
In reply to परिचयाबद्दल धन्यवाद, मुवि. by आदूबाळ
आभारी आहे.
In reply to पुस्तक... by मुक्त विहारि
माझे आभार नका मानू.....मी मिपाकर आहे...
In reply to आभारी आहे. by आदूबाळ
बापरे...जबराच पुस्तक दिस्तंय.
लेखकाने व्यसने का लागतात?
In reply to बापरे...जबराच पुस्तक दिस्तंय. by बॅटमॅन
धन्यवाद, नक्की वाचेन.
In reply to लेखकाने व्यसने का लागतात? by मुक्त विहारि
+१
In reply to धन्यवाद, नक्की वाचेन. by बॅटमॅन
+१००
In reply to लेखकाने व्यसने का लागतात? by मुक्त विहारि
एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.वाचायलाच हवं असं पुस्तक
इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं
In reply to वाचायलाच हवं असं पुस्तक by प्यारे१
धन्यवाद...!!!
नातुंचा ब्लॉग वाचला होता
हॉरिबल
मुवि
अगदी असेच वाटले...... अगदी मी
In reply to मुवि by विटेकर
भयानक!
>>> पण परत फिरण्यासाठी फक्त
In reply to भयानक! by पैसा
अवांतर :