जो दिल हारा वोह सब जीता
मीं खोल खोल कोसळत असतेवेळी, तुझी भूमिका नक्की काय होती? फक्त एक तटस्थ खरं तर उदासिन प्रेक्षकाची की अशा एका मित्राची ज्याला मला खरं पाहता हात देऊन वर ओढायचे होते पण तसे करणे जमत नव्हते, बघ्याची असहाय भूमिका करण्यापलीकडे काहीही करता येत नव्हते? की तळ्याच्या काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पहाण्याचा आसुरी आनंद मिळवणाऱ्या सेडिस्टच्या भूमिकेत तू होतास्? मला कळतच नाही. तू बोलत नाहीस आणि माझ्याकडे तरी कुठे अशी जादूची कांडी आहे की मला तुझ्या मनातले ओळखता यावे?
मिसळपाव
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.