परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे
२० नोव्हेंबर २०१६
आठवड्याभराचा खोकला म्हणून आमचे आईसक्रीम बंदच आहे. आज नेमके तिला सोबत मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि सोलकढी घेण्याच्या निमित्ताने तिची नजर आईसक्रीम वर पडली. एवढ्या दिवसांचा आतला सुप्त शैतान जागा झाला. आणि त्या बॉम्बे टू गोवा मधील "पकौडा पकौडा" सारखे "आईसक्रीम आईसक्रीम" सुरू झाले. खोकला ताजा असल्याने विकत घेऊन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या नादात माझी सोलकढीही राहिली. तिला कसाबसा गुंडाळून तिथून निघालो. आणि तिथेच चुकलो. जेवढे तिला आवरायचा प्रयत्न करत होतो तेवढी ती जास्त दंगा घालू लागली. आईसक्रीमच्या दुकानापासून जसा लांब जाऊ लागलो तसा मला थडाथड लाथाबुक्यांचा प्रसाद मिळू लागला.
मिसळपाव
...अरे हो, हे पुस्तक बघ. तुला नक्की आवडेल.
डिसेंबर महिन्यात एका काकाच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बराच वेळ गप्पा, जेवण आणि इतर विषय बोलून झाल्यानंतर काकाकडे असलेले कैलास मानस सरोवर यात्रेवरील एक पुस्तक वाचून संपवले. रात्री झोपण्याआधी काकाने अचानक एक पुस्तक हातात ठेवले.
भरभक्कम वजनाचे ते पुस्तक बघून आणि विशेषतः त्यातील अनुक्रमणिका बघून झोप उडालीच.