Skip to main content

प्रकटन

वजनाचा काटा --भाग ९

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 02/03/2018 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
वजनाचा काटा --भाग ९ हृदयविकार-- एक वेगळा विचार साधारण पणे हृदयाच्या रक्तवाहिनीत कोलेस्टिरॉल/ चरबीचे अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे हृदयविकार होतो. पण लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो आणि वजनदार मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही? याचा विचार आता आपण करू. रक्तात चरबी/ कोलेस्टिरॉलचे प्रमाण वाढले कि या चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमा होऊ लागतात.

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

मिसळ पाव : एक दुथडी भरून अखंड वाहणारी, मराठी भाषेची नदी , एक मराठी भाषेचं ज्वलंत व्यासपीठ .. तिला मानाचा मुजरा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 27/02/2018 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचक मंडळी ... आज मराठी भाषेच्या दिनानिमित्ताने सर्व वाचक बंधू आणि भगिनींना , प्रियजनांना , गुरुजनांना आणि साहित्य संपादक मंडळातील आजी आणि माजी सभासदांना लाख लाख शुभेच्छा .... सर्व प्रथम आभार त्यांचे मानतो ,, ज्यांनी हे ज्वलंत व्यासपीठ निर्माण केले .. मनापासून आभार ... आज या प्राणप्रिय भाषादिनानिमित्ताने , मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत ... मी दुखी असताना ज्याप्रमाणे मला माझ्या मुलांनी त्या दुःखातून बाहेर काढलं तसाच काहीसा हातभार तेव्हा या व्यासपीठानेही दिला .. मी माफीनामा जाहीर केला आणि तुम्हा सर्वांचे अभिप्राय वाचून काहीसा हलका झालो ...

मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 27/02/2018 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.' आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.

प्रिय मायमराठी

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 27/02/2018 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ २.०

लेखक बार्नी यांनी रविवार, 25/02/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भारतातील आरक्षणावर खासगीत आणि आंतरजालावर बरीच चर्चा केली जाते , परंतु बर्याचदा चुकीच्या माहितीच्या आधारावर ह्या चर्चा चालतात म्हणूनच आरक्षणाविरोधातील काही चुकीच्या युक्तिवादांना उत्तर देण्यासाठी केलेला हा प्रयत्न. १) आजकाल कुणीही जातपात पाळत नाही. परंतु खालील सर्व्हे बघता अजूनही भारतात जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते . शहरांमध्ये सुदधा . "Going by respondents’ admissions, untouchability is the most widespread among Brahmins, followed by OBCs.

नाईस टू मीट यू

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 24/02/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.

देव आहे कि अजून कोण ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 23/02/2018 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,, आम्हाला गाव नाही आहे .. आम्ही मुळातच कोयना प्रकल्पग्रस्त असल्याने जी काही मजा केली ती कोकणातच .. मामाच्या गावी ... चिपळूणमध्ये ... चिपळूणमधून वर कुंभार्ली घाट चढला कि घाटमाथा चालू होतो .. तिथून थोडी गावं पार केली कि आमची ग्रामदेवता पद्मावती नव्याने बसली आहे .. तिचे दर्शन तसं म्हंटल तर वर्षातून एकदा तरी घेतो कुटुंबासमवेत ... कधीकधी मनात आलं आणि एकटाच चिपळूणला गेलो असेन तर मामेभावाची बाईक काढून देवीच्या दर्शनाला जाऊन येतो ... कोयना एक निसर्गरम्य ठिकाण .. घनदाट झाडी ... भरपूर प्राणी आणि झुळझुळ वाहणारे अखंड पाणी ... खरंच हेवा वाटावा असं ठिकाण ...

मन करा थोर!

लेखक समयांत यांनी बुधवार, 21/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' ह्या प्रसिद्ध नाट्यपदातील शब्द आहेत 'मन करा थोर!'. आपण मनोव्यापारातले नाविक आहोत, कोलंबसाने मनोमन 'भारता'ला चंद्र बनवले होते, ध्यास घेतला होता आणि पूर्ण जगाला वळसा घालून त्याने मनाने थोर आहे, हे सिद्ध केले होते. तसेच आता 'सत्त्वा'ला चंद्र बनवून स्वतः चकोर बनत संपूर्ण आकाशगंगेत आपल्याला गरुडभरारी घ्यायची आहे, थोर मनाची व्याख्या पुन्हा नव्याने लिहायची आहे. विश्व आता पृथ्वीपुरता सीमित राहिलेले नाही. हे सत्व सत्व आहे तरी काय नेमके? ते मनाने माणूसपण जपण्यात आहे.

जागतिक मराठी भाषा गौरव दिन (आवाहन)

लेखक सरपंच यांनी सोमवार, 19/02/2018 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेली २ वर्षे आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती. प्रमाणभाषेबरोबरच पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन संवर्धन करणे ही त्यासाठी आपली जबाबदारी आहे. २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.