Skip to main content

प्रकटन

मराठी बोला

लेखक साहना यांनी गुरुवार, 17/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतीलआमच्या बिल्डिंग मध्ये एक हॉल `तेलगू समाजा`ने भाड्याने घेतला. त्या भागांत अनेक तेलगू लोक राहत असल्याने आणि बहुतेक उच्चशिक्षित असून त्याची मुले इंग्रजी शाळांत जातात आणि त्यांना तेलगू लिहायला वाचायला येत नाही. ह्या हॉल मध्ये एक प्रकारची सायं शाळा चालवायचा त्यांचा इरादा होता जिथे लहान मुलांना तेलगू भाषा, गीते शिकवली जातील, वृद्धांना येऊन चकाट्या पिटायला मिळतील आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करता येईल असा त्यांचा इरादा होता. सर्व काही सुरळीत झाले. त्यांनी कायद्याला अनुसरून मराठी, इंग्रजी भाषेतील फलक लावला आणि त्याच बरोबर भाला मोठा तेलगू भाषेतील फलक सुद्धा लावला.

पुनःश्च - किरण भिडे

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 14/05/2018 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, किरण भिडे यांच्या वतीने हा लेख इथे देत आहे. धन्यवाद. ------------------------------ a दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं.

आई...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 13/05/2018 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहात होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं. डोळे मिटून लिहायचं. जमेल, आठवेल, सुचेल तसं लिहीत जायचं. आणि शब्द संपले, की त्या क्षणी, तिथे थांबायचं. तसंही, यावर लिहिताना, भल्याभल्यांना शब्द सापडत नाहीत.

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 12/05/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार, नमस्कार म्हणजे काय त्रिवार दंडवत नमस्कार हो, कारण मिपावर आल्या दिवसापासून बघतूया. एकेक सुपरस्टार हायेत राव हितं. आपले मिपाकर म्हणून नाते जुळत जातंया आणि अचानक कळतंया हे माणूस लै वल्ली है. इथं आपल्यासारखा मिपाकर म्हनून वावरतंय पन असली दुनियेत लैच नाव कमवून हाये. ज्या गोष्टी उगा आपण पेपरात बिपरात वाचतांव, टीव्हीवर बघताव ती माणसे चक्क मिपावर हायेत आपल्या संगं. मला तर कवाबवा असंबी वाटतंय की आपन लैच चिल्लर हाय राव. पण मिपाकरांनी अशा अटकेपार रवलेल्या झेंड्याचे कवतिक तर असणारच ना भौ. एकतर आपलं माणूस असतंय. आपलं मराठी माणूस.

माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 12/05/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे. विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं. माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे.

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 08/05/2018 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याच प्रयत्यानंतर मला उठून बसता आले. माझे डोके मागच्या बाजूने भयंकर दुखत होते. कोणीतरी सतत डोक्यावर हातोड्यानी मारत आहे असा भास होत होता. त्यात हा आजूबाजूचा कल्लोळ. हे काय..आता तर चक्क रडणाच्या आवाज येतोय. मला पूर्ण भानावर यायला मिनीटभराचा अवधी तरी लागला असेल. समोर कोण रडतयं हे पाहिल तर चक्क माझीच आई रडत होती. "काय झाल आई ..आणि एवढी लोक का जमली आहेत घरात ?" मी प्रश्न केला. आईने उत्तर न देता रडणे चालुच ठेवले. आजूबाजुचे लोक कुजबुज करत थांबले होते. मला ते अगदी पाहवेना. मी आईला शांत करण्यासाठी पुढे चाललो. चालताना पाय कशात तरी अडकला.

लेबलं

लेखक mayu4u यांनी सोमवार, 07/05/2018 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारच्या बाजूने बोललो तर भक्त. सरकार विरोधात बोललो तर देशद्रोही. हिंदू धर्मविरोधात बोललो तर बुबुडाउविपुमाधवि*. हिंदू धर्माच्या बाजूने बोललो तर सनातनी, हिंदुत्ववादी, प्रतिगामी. जातीव्यवस्थेविषयी बोललो तर बामणी, मनुवादी. जातीव्यवस्थेविरोधात बोललो तर आंबेडकरवादी, फुलेवादी. खर्चाच्या बाजूने बोललो तर भांडवलशाही. काटकसरीच्या बाजूने बोललो तर समाजवादी. स्त्रियांना विशेष अधिकार असावेत बोललो तर फेमिनाझी. स्त्रियांना विशेष अधिकार नसावेत बोललो तर एमसीपी. प्रार्थनेच्या बाजूने बोललो तर आस्तिक. कर्मकांडाविरोधात बोललो तर नास्तिक. आठवणीतून एखादा किस्सा सांगितला तर खोटारडा, फेकू. मुद्द्याच्या समर्थनार्थ

अंतर्मुख!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/05/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या. गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली. म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले. फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते... अगदी साधे. बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे! त्यावर एक वाक्य होते- ‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’ ...

ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/05/2018 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये अशी एक म्हण आहे, पण मला वाटते वयाच्या एका टप्प्यावर सगळयांनाच "कस्त्वं कोऽहं कुत आयातः" असे प्रश्न पडत असावेत आणि मग माणूस आपल्या मुळाचा म्हणजे मूळ ठिकाण गाव देश कुलदैवत वगैरेचा विचार करू लागतो आणि शोध घेऊ लागतो. माझेही थोडेसे तसेच झाले आणि मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. बरीच वर्षे इकडे तिकडे चौकशी केली, जे जे कोणी मेहेंदळे आडनावाचे भेटत गेले त्यांच्याकडे विचारत गेलो.