Skip to main content

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 18/10/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

नपुंसकत्व

लेखक राहुल यांनी शनिवार, 01/10/2022 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
नपुंसकत्व पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी गुरुवार, 29/09/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ? विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी बुधवार, 28/09/2022 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

लेखक राहुल यांनी सोमवार, 26/09/2022 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते. विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.

सेक्स फॉर रेकॉर्डस

लेखक राहुल यांनी रविवार, 25/09/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
◼वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/09/2022 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/09/2022 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्‍मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून. मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्‍याचदा प्राणि पुरणे.