अज्ञाताचे लेख
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
-ग्रेस
मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या.
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.
मिसळपाव
चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.