Skip to main content

माहिती

गझल गायक 'सुधाकर पांडुरंग कदम'

लेखक माहितगार यांनी बुधवार, 27/01/2016 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे आर्णी जिल्हा यवतमाळ येथील कुणी 'सुधाकर पांडुरंग कदम' गझल गायकी करत असावेत. विकिपीडीयावर बर्‍याच केसेस मध्ये ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे कठीण जाते. तसेच काहीसे सुधाकर कदम यांच्या विषयीच्या लेखाबाबत झाले आहे आंतरजालावर इतरत्रसुद्धा त्यांनी स्वतःबद्दल स्वतः मोठ्या प्रमाणावर लिहिले असणार त्यामुळे स्वतंत्र संदर्भ शोधणे कठिण जात आहे. एकीकडे छोट्या गावांमधील गतीविधींची शहरी माध्यमांकडून दखल कमी घेतली जाऊन मूळ नोंदी कमी पडतात मग संदर्भांच्या अभावी ज्ञानकोशीय दखल घ्यावी अथवा नाही असा प्रश्न पडतो.

सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत

लेखक अभिनव यांनी बुधवार, 27/01/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता. हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल? २. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात.

पॉपकॉर्न ची गरज आहे का?

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 26/01/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
पॉपकॉर्न ची गरज आहे का? पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत . पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? - पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात. पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे.

मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 25/01/2016 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात. पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे, तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किं

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 23/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 22/01/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला. आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती. या परिसंवादात श्री अभय फिरोदीया.

शोध राजीव हत्येचा भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 16/01/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या. घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत.

झोंबी - आनंद यादव

लेखक वाचनछंद यांनी सोमवार, 04/01/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
असचं कधीतरी, कोणीतरी वाचनासाठी सुचवलेलं. वाचायला हातात घेतल आणि मग वाचून पूर्ण होईपर्यंत ध्यासवेडीच होऊन गेले. आनंद यादव या व्यक्तीचे बालपण अतिशय प्रखर परिस्थितीतून गेलेय. हा बालपणी सोसावा लागलेला संघर्ष वाचताना डोळ्य़ातून अश्रूधारा वाहू लागतात. घरची बेताची परिस्थिती, त्यातच जोडीला ९ भावंडे. शाळेला जाण्याचा विचार करणेही जेथे गुन्हा ठरले होते, त्या घरातून एक ध्येयवेडा मुलगा शिक्षण पूर्ण करुन, डॉक्टर आनंद यादव होतो. आन्द्याचे शिक्षण इयत्ता चौथी पूर्ण होताच बंद केले गेले. नंतर त्याला शेतकीच्या कामामधे वडिलांच्या हाताखाली झिजावे लागले.