Skip to main content

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 22/04/2016 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद. या पुणे विभागाच्या अनुदिनी गटाच्या अभिनव प्रयोगाची पावले मिसळपाव.कॉम, मायबोली.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम या मराठी संकेतस्थळावरही या निमित्ताने पडली हे विशेष. या सर्व संकेतस्थळांवरही या प्रयत्नाचे चांगले कौतुक झाले. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातूनही या अनुदिनीच्या लिंक्स सर्वत्र फिरत होत्या हे या अभिनव ध्वनी अनुदिनीचे यशच म्हणावे लागेल.

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 21/04/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी...

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 14/04/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच. खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील. १. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा. २. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील. ३.

२. सु.शिं.चे मानसपुत्र- दारा बुलंद

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 07/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. सु.शिं.चे मानसपुत्र

दारा बुलंद

मागच्या काही भेटीमध्ये सुगंधा काकूंनी (सुगंधा सुहास शिरवळकर) त्यांच्या आठवणी सांगताना एक अशीच आठवण सांगितली. जी बहुदा सुहास शिरवळकर: असे आणि तसे मध्येही आली आहे. सु.शिं.ना भेटायला त्यांचे अनेक फॅन्स महाराष्ट्र , देशभरातून आणि परदेशातून यायचे. त्यातल्या काही मुली खास करून दारा बुलंदला भेटायचे म्हणून सु.शि. आणि काकूंकडे हट्ट धरायच्या. मग त्यांची समजूत काढता काढता शिरवळकर द्वयींच्या नाकी नऊ यायचे.

आउटलायर्स : पुस्तक परिचय

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 04/04/2016 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता. यापैकी सगळ्यात पहिला ‘अदृश्य’ घटक म्हणजे ‘जगावेगळ्या संधी आणि नशीब’.

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

लेखक टुंड्रा यांनी गुरुवार, 31/03/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे. मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत.

बोट - अग्निशमन (Fire Fighting)

लेखक स्वीट टॉकर यांनी शनिवार, 26/03/2016 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही. भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.

सु.शिं.चे मानसपुत्र

लेखक अजिंक्य विश्वास यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन. २ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली) आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा) हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे. चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून- कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-!

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग ३ --- महानायाकांचा करार

लेखक मोग्याम्बो यांनी बुधवार, 23/03/2016 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १ Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग २ - स्पायडरमॅन एक स्वप्न स्पाइडरमॅनची चित्रपट मालिका परत का सुरु कली? फॅन्टास्टिक फोर चित्रपटांची पहिल्या मालिकेला फारसे यश मिळाले नव्हते तरी दूसरी मालिक त्यांनी का तयार केली? व्होलव्होरिन ह्या महानायकाचे फ़क्त त्याच्यावर संबंधित चित्रपट चालत नाहीत पण त्याचे सतत चित्रपट बनत आहेत, असे का होत आहे?