दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन
मंडळी,
सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीम
चे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.
ग्राम स्वराज्य अभियान टीमने गावकऱ्यांना ग्रामसभेचं महत्त्व पटवून देऊन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला चांगलंच यश मिळालं. आता गावात दर महिन्याला ग्रामसभा होते आणि गावासाठीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत घेतला जातो.
मिसळपाव