Skip to main content

माहिती

घोस्टहंटर-१

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 16/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 15/12/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी! नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८ महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे (टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!) कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास - संपर्क करा :- श्री. अक्षय वाटवे ९४२०२६०८०८

मीना (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/12/2015 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 15/12/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक जून 1674 मध्ये करून घेतला व मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना व्यापक व प्रभावी होती. त्यामुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर व व्यक्तीचे गुणदोष पाहूनच ठरवण्यात येत.

वय वर्ष ९३

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 14/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ताबडतोब गूगला. नारायण महाजन. #respect #साष्टांग कोटी कोटी नमस्कार असा संदेश व्हॉट्सॅपवर एका भावाने पाठवला. काहीतरी जबर असणार अशी खात्री होतीच त्यामुळे ताबडतोब गूगललं गेलं. आणि जी माहिती मिळाली ती पराकोटीची प्रेरणादायी होती. नारायण महाजन. ही व्यक्ती ठाण्यातील वेध च्या व्याख्यानमालेत या वर्षी आली होती. इथे सामान्यांतील असामान्यांना बोलावलं जातं. नारायण महाजन या व्यक्तीने ९१ व्या वर्षी ३५०० फूट रॅपलिंग केले म्हणून लिमका बुकात या नावाचा समावेश झाला आहे. ट्रेकिंगचं वेड अनेकांना असतं. पण त्याचबरोबर फिटनेसचंही वेड असलेले नारायण महाजन म्हणजे तरुणांसाठी; तरूणच काय प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत.

पालखेडची लढाई - पहिले बाजीराव पेशवे

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 08/12/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एखाद्या पराक्रमी अाणी बुद्धिवान सेनापतीचे नाव घ्यावे लागले तर ते पहिल्या बाजीरावांचे घ्यावे लागेल. ’पालखेडची लढाई' ही पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई. ही लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निझाम यांच्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळील पालखेड येथे झाली. या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. पालखेडची लढाई बाजीरावांच्या युद्धतंत्राचे तसेच गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण आहे.

पैस - दुर्गा भागवत

लेखक प्रसाद प्रसाद यांनी मंगळवार, 08/12/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते. या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे. पहिला ‘स्व‍च्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे. दुसरा लेख ‘पैसाचा खांब’ या लेखावरूनच पुस्तकाला पैस नाव दिले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या छोट्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला ज्ञानेश्वर पैस म्हणतात.

रॉयल कॅफेसाठी मदत हवी.

लेखक विलासराव यांनी सोमवार, 07/12/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे. काय योग्य राहील. फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे. वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का? अशी चर्चा अपेक्षीत आहे. झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा. #मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १

लेखक अजया यांनी रविवार, 06/12/2015 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच! लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्‍या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही.