Skip to main content

ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 22/03/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.

आंतरजातीय विवाह

लेखक निकुंज यांनी मंगळवार, 22/03/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

भारताबाहेरील ऐतिहासिक हिंदू मंदिरे - भाग १

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 19/03/2016 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो, इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते.

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

लेखक गॅरी शोमन यांनी शनिवार, 19/03/2016 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.

(छटाक)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 18/03/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला.

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

लेखक राघवेंद्र यांनी मंगळवार, 15/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

बोट - वादळवारा

लेखक स्वीट टॉकर यांनी सोमवार, 14/03/2016 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते? लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब. यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी). तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही?

अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 12/03/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

मागच्या भागात जाण्यासाठी ...... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- मागच्या भागात आपण संख्या कश्या रीतीने मांडल्या ते आपण पाहिले. आता या भागात सोरोबन वापरून बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत.

बोटीवरील जीवन

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 10/03/2016 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिलेली

माहिती हवी: ६ महिन्याच्या बाळाचा आहार आणि त्याच्या योग्य वेळा

लेखक उमेश पाटील यांनी बुधवार, 09/03/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
६ महिन्याच्या बाळासाठी कोणता आहार कोणत्या वेळी द्यावा, कृपया मार्गदर्शन करावे सध्या खालील आहार देत आहोत बदामाचे वेढे - १ वेळा भाताची पेज - २ वेळी डाळीचे पाणी - २ वेळी (भाताच्या पेजे ला पर्याय) कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.