दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच!
लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही.
मिसळपाव