Skip to main content

माझे जगावेगळे छंद-२

लेखक पाऊसवेडी यांनी सोमवार, 07/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का??

नुक्ता चीं हैं गमे दिल..

लेखक संजय अभ्यंकर यांनी शनिवार, 29/08/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ता चीं हैं गमे दिल उनको सुनाये ना बने... ह्या गझलची जादू अशी की तीने अनेक गायक, संगीतकारांना वेड लावले. हि मिर्झा गालीबची गझल, अनेक संगीतकारांनी चालीत बांधली. अनेक गायकांनी ती गायली. ह्या गझलच्या अनेक छटांचे संकलन करण्याचा मानस आहे. ह्या पैकी सुरय्या, नुरजहाँ, रफी साहेब व सैगल साहेबांच्या आवाजातील गझल यु ट्युब वर उपलब्ध आहेत. हि गाणी येथे ऐकता येतील. आणखी गायक, संगितकारांच्या छटा हव्या आहेत. कृपया मिपाकरांना माहीत असल्यास दुवे द्यावेत.

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला नैसर्गीक फिल्टर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 28/08/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा. पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/08/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो... परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक! आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्‍या होणार्‍या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो.

आमच्या गावचा पोळा

लेखक अनामिक यांनी गुरुवार, 20/08/2009 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो जालावरून साभार आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.

रफ"/ "टरफ" ची भाषा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 18/08/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नरफमस्कार , मीरफी बरफंड्या, अरफसे आरफामी शारफाळेत अरफसाताना बोरफोलत आरफासु ? काही कळत नाहीये का ? मदनबाण यांची स्वाक्षरी वाचली ती अशी "चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो" ही "च" ची भाषा. आम्ही शाळेत असताना "रफ"/ "टरफ" ची भाषा वापरायचो , तिची आठवण झाली उदा : तुझे नाव काय ? = तुरफुझे नारफाव कारफाय ? ( रफ ची भाषा ) = तुटरफुझे नाटरफाव काटरफाय ?

घरघर!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 18/08/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा माझी बायको मंजिरी हिने लिहिला असुन आम्ही फक्त त्याचे वाहक आहोत. तिच्या रिअल इस्टेट मॅनेजमेंट व सर्व्हिसेस या व्यवसायातील अनुभवांवर आधारित आहे. मिपाकरांना आपल्या आयुष्यात घर घेताना कदाचित त्याचा उपयोग होउ शकेल.
घरघर
(मंजिरी घाटपांडे) आयुष्यात कित्येकदा अशा वेळा येतात की जुन्या म्हणींवर अंधविश्वास ठेउन चालत नाही. ते त्याच्या जागी आपण आपल्या जागी अस वाटायला लागत. किंवा निदान त्या म्हणी त्यांचे अर्थ तपासुन तरी पहावेसे वाटतात.