मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?

मुक्त विहारि ·
https://misalpav.com/node/47970 ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे. माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात. काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो. मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन. 1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत. फोन नंबर देतो .... 9405767101 2. आंबा विक्री करणारे अजून काही जण आहेत .... A. विवेक केळकर, खेरशेत....

मराठी रेडिओ

निमिष ध. ·
माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा: रूपा धारप देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता. अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती.

स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)

दुर्गविहारी ·
अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्‍याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्‍या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा.

आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध !

Ashutosh badave ·
आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध ! marathe ingraj शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !

Ashutosh badave ·
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !पंडित मालवीय शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें.

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ७ हनुमंताचे वृत्तांत-निवेदन !

Ashutosh badave ·
हनुमान रॅम भेट मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला.

"शिकायचं कसं" ते शिकूया

उपाशी बोका ·
नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न. SMART Goals स्मार्ट गोल्स सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो.

मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद

चलत मुसाफिर ·
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो) *** संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय.