Skip to main content

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 19/12/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
अनामिका
ताईने मला अचानक का बोलावून घेतले ते समजले नाही. नाही म्हणायला भावोजींनी तिच्या आजाराची कल्पना आम्हाला दिलीच होती. मी आई बाबांबरोबर वेळ मिळेल तशी वरचे वर येत होते. पण काल मला तिने फोनवरून तातडीने बोलावून घेतले. जरा काळजीत वाटली . मी आले तेव्हा भावोजी तनयाला आणायाला शाळेत गेले होते. शेजारच्या घोलेकाकूंनी दरवाजा उघडला. " ये गं वेळेवर आलीस " " काकू, कशा आहात तुम्ही? आणि ताई कशी आहे?" " माझं बरं आहे. आताच आमचा चहा झाला, आता तू आलीयेस तर मी निघते.

श्री -भाग 2

लेखक मीता यांनी गुरुवार, 19/12/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई रागावली कि रूम मध्ये जाऊन दार लावून बेड वर अंग टाकून द्यायचं आणि आपल्याचं डोक्यावर थापटत बसायचं ..मीता च नेहेमीचच होत हे .. अशीच एकदा रूम मध्ये असताना फोन वाजला . श्री चा तिला आलेला पहिला फोन . श्री - नमस्कार .मी श्री बोलतोय .मीता आहे का ? मीता - हो बोलतेय . श्री - मी तुम्ही काढलेलं चित्रं पाहिलं ओर्कुट वर आणि मला ते आवडलं .तुमचा फोन नंबर मिळाला समीर कडून . ते चित्र विकत घ्यायची माझी इच्छा आहे . मीता- तुम्हाला चित्र आवडलं त्याबद्दल Thanks .पण मला चित्र विकायचं नाहीये . असं म्हणून मीतानी फोन ठेवून दिला . "काय कटकट आहे ..सुखानी रडू पण देत नाही " मीता स्वतः: शी बोलली.

२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

लेखक सचीन यांनी बुधवार, 18/12/2013 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.

जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 17/12/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

बालपणातल्या हिरोंसोबत

लेखक नवनाथ पवार यांनी मंगळवार, 17/12/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्यान कुठल्या निमित्ताने घरात सतत साफ सफाई सुरु असते. आईने अचानक एकदा फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके. एक एक वस्तू मला भूतकाळात नेणारी.

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन

लेखक सचीन यांनी शनिवार, 14/12/2013 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत.

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट यांनी गुरुवार, 12/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

गुंतवणूक आणि गुंतागुंत

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 12/12/2013 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्यापैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला, पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंतागुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.