Skip to main content

लेख

कथा एका निवडणुकीची

लेखक हर्षद खुस्पे यांनी बुधवार, 16/10/2013 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग. कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे.

देरसूचा निरोप..........भाग १ - निशाचर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/10/2013 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
१ निशाचर १९०२ साली माझ्यावर एका अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा प्रदेश अत्यंत दुर्दम्य आणि मानवी वस्ती नसल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे नकाशे उपलब्ध नव्हते हे सांगायला नकोच. या प्रदेशाच्या पश्चिमेला आमुर व युसुरी या दोन अवखळ वाहणाऱ्या नद्या आहेत तर पूर्वेला जपानचा समुद्र आहे. व्लाडिओस्टॉकच्या उत्तरेला असलेल्या या प्रदेशाचा इंग्लिश नकाशांमधे ‘ मॅरीटाईम प्रॉव्हीन्स ’ असा उल्लेख आढळतो पण खुद्द या प्रदेशात त्याला युसुरिया म्हणूनच ओळखले जाते, ते युसुरी नदीमुळे.

अव्यक्त…

लेखक मेघनाद यांनी सोमवार, 14/10/2013 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहून बरेच दिवस झाले असल्यामुळे येथे पहिल्या भागाचा दुवा येथे देत आहे. इच्छुक वाचकांनी दोन्ही भाग अनुक्रमे वाचावेत हि विनंती. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आणि गाणं पूर्ण होत न होत तोच तो नाजूक चेहरा पुन्हा राजीवच्या डोळ्यासमोर अवतरला…आता ती सुंदरी तिच्या शुभ्र कपड्यांमध्ये तर अगदी परीवाणी भासत होती. राजीवच्या नजरेस तर आता दुसरं काही दिसतंच नव्हतं.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 08/10/2013 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....

मला जगायचंय !

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 04/10/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत..... घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो...... तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत.....

मोनार्क - ३

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 03/10/2013 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
मोनार्क - १ मोनार्क - २ https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png शिक्षण पूर्ण करताच डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी प्राणीशास्त्र हा विषय युनिवर्सिटीत शिकवण्यास सुरवात केली.

मोनार्क - २

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 30/09/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
मोनार्क - १ https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट(Dr. Fred Urquhart). खिडकीत तासनतास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला.