मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधितरी...

अनन्त्_यात्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अमेरिकन कवी थॉमस एस. जोन्स यांची "sometimes" ही एक अल्पाक्षरी कविता. बालपणी ध्यानी, मनी, स्वप्नी उराशी बाळगलेल्या व पुढे जगरहाटीच्या तडाख्यात नामशेष होऊन स्मरणमात्र उरलेल्या आपल्या महत्वाकांक्षांबद्दलचं हृदयस्पर्शी भाष्य म्हणजे ही कविता! ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा माझा प्रयत्नः ACROSS the fields of yesterday He sometimes comes to me, A little lad just back from play— The lad I used to be. And yet he smiles so wistfully Once he has crept within, I wonder if he hopes to see The man I might have been. ======================== कधितरी... ---------- भेदून पटल काळाचे तो कधितरी भेटिस येतो येताना अवघे माझे तो शैशव लेऊनी येतो का त्याच्या चेहेर्‍यावरचे हसणे अवचित काजळते? माझ्या हत आकांक्षांचे का पिशाच्च त्याला दिसते?

वाचने 3270 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पुंबा 09/10/2017 - 12:20
अहाहा!! एकदम प्रत्ययकारी! अत्तर एका कुपीतून दुसर्‍या कुपीत ओतावं तसं(श्रेयः श्री. मा. माटे)

अनन्त्_यात्री 09/10/2017 - 19:03
पद्मावति, यशोधरा, सौरा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!