Skip to main content

बातमी

जनगणना - देवाची पण ??

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 12/04/2011 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

लेखक KanchanKarai यांनी मंगळवार, 12/04/2011 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, २०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे. या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे.

जपान मध्ये पुन्हा भुकंप

लेखक विनायक बेलापुरे यांनी गुरुवार, 07/04/2011 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धर्मांतरण

लेखक विश्वास कल्याणकर यांनी बुधवार, 06/04/2011 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील अज्ञानी लोकांना एकुलत्या एका देवाच्या उपासनेस प्रवृत्त केल्याबद्दल भारत सरकारने फादर जॉन्सन यांचा सत्कार केला होता. भारतात १० वर्षापर्यंत धर्मप्रसाराचे काम केल्यानंतर ते अमेरिकेला परतले. ह्युस्टन येथे फादर जॉन्सनची मुलाखत घेण्यात आली.

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

अभिषेक, आमीर खान आणि ऐश्‍वर्या मराठी चित्रपटामध्ये !

लेखक मोगली यांनी शुक्रवार, 01/04/2011 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले ! अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे. खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.