Skip to main content

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे च अगदी मोबाईल नंबर सहित.

प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

लेखक यकु यांनी मंगळवार, 01/02/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय. सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. म.टा.

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

लेखक अनिता यांनी सोमवार, 24/01/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे.

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 03/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सकाळच्या Today पुरवणीत एक बातमी होती. क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी बद्दल. त्यात म्हणले होते की "ह्या जमीनी ४० वर्षापासुन पडीक आहेत. हे संशोधकांसाठी आव्हान आहे." सविस्तर बातमी येथे वाचा. http://72.78.249.107/Sakal/2Jan2011/Enlarge/PuneCity/PuneToday/page2.htm काही दिवसांपुर्वी लोकप्रभामधे एक लेख आला होता.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 22/12/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 11/12/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत. मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला.