Skip to main content

मिपाकरांसाठी खुषखबर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो.

लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 08/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या... Sybille Hein सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.

रारंग ढांग पोरका झाला..

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 08/10/2010 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे' कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते.

"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/10/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला. सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच. रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर. बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही? कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता.

भारताच्या क्रिडा क्षेत्राला चांगले दिवस.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 19/09/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी धोरणात क्रिडा प्रकाराला जरी फारसे चांगले स्थान नसले तरी काही क्रिडा संघटनाची चांगली कामगिरी आणि खेळाडुंच्या अथक परीश्रमामुळे चांगले दिवस येउ लागले असे वाटत आहे. आजच बातमी आली की भारताची महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम.सी. मेरीकोम हिने सलग पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे. प्रथमतः तीचे अभीनंदन. काही दिवसापुर्वी ऑलींपिकमधे कांस्य पदक मिळविणा-या सुशिलकुमार या मल्लाने जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तत्पुर्वी तेजस्वीनी सावंतने इतीहास घडवला.

मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 10/09/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग! मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे! न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल.

या गोष्टी reciprocal नकोत का?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 07/09/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज इंडियन एक्सप्रेसमध्ये खालील बातमी वाचली. या दुव्यावर सविस्तर वाचा. http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/09/07/ArticleHtmls/07_09_20… Govt may allow Pak judicial panel to visit, interrogate Kasab अशा तडजोडी एकतर्फी नाहीं कां वाटत? अशी परवानगी आपण पाकिस्तानी judicial panelला दिली तर त्या बदल्यात आपल्या judicial panel ने पाकिस्तानात जाऊन भारतीय कैद्यांची चौकशी करायची मागणी का करू नये? उदा. आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां?