Skip to main content

बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा!

लेखक चित्रा यांनी रविवार, 20/11/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) अधिवेशन म्हटले की अमेरिकेतील मराठी माणसांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. १९७३ पासून दर दोन वर्षांनी बीएमएमचे अधिवेशन ही आता एक परंपराच झाली आहे. यावेळचे हे २०१३ चे अधिवेशन बॉस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेतील विद्येच्या माहेरघरी भरणार आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ चार ते पाच हजार मराठी मंडळी अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांतून बॉस्टनला येणार असा अंदाज आहे.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

मराठी विज्ञान परिषद - निमंत्रण

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 26/10/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक स्नेह्यांकडून हे खालील निमंत्रण मिळाले. मराठी विज्ञान परिषदेकडून आलेले असल्याने मराठी बाण्यावाल्या आपल्या मिपाकरांना हे पाठवत आहे. जर अधिक माहिती साठी तुम्हाला निमंत्रण पत्रिका (पीडीएफ) हवी असेल तर मला खरडीवर/व्यनिने कळवा आणि मी तो संदेश आपल्या पत्त्यावर ढकलून देईन. ----आलेला निरोप येथे सुरु----- नमस्कार, ४६ व्या अ. भा. विज्ञान अधिवेशनाचे निमंत्रण सोबत पाठवत आहे. आपण या कार्यक्रमास जरुर यावे. आपल्याला शक्य असेल तर पुर्णवेळ प्रतिनिधी म्हणून नोंदणी करावी ही विनंती. -विनय र. र.

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/10/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे.

प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा..

लेखक श्रीरंग यांनी रविवार, 23/10/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी.

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

नव्या संपादकांचे अभिनंदन

लेखक क्रेमर यांनी बुधवार, 05/10/2011 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे.