आस्वाद
एका सुन्दर मुलीसाठी
सुन्दर सुन्दर ओ तुझे
जणू ऊषेची लाली शोभते
डोळयतील इशारे बघुन ते
भाळी कुन्कू लाजते
कानात ग डूल तुझ्या
कुन्द्कळ्यातुन झळके स्मित
नाकातील नथनी गाते
माझ्या प्रीतीचे गीत !
वार्याशी जणु झिम्मा खेलती
बटा या भालप्रदेशी
कानातुन किणकिणती पदके ही
जणु खजुराहोची नक्षी !
केस तुझे ग गर्भरेशमी
वाराही त्यातुन मोहुन वाहे
वेडा होउन प्रत्येकजण हा
चेहरा तुझाच पाहे !
अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras
निकामी
नात्यातले उमाळे- नसतात सत्य सारे
ओठांवरील शब्द ,नुसतेच वांझ भारे
हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने
हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे
आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही
कोणासही कराव्या का व्यर्थ वल्गना मी
माझे मलाच ठावे, ठरलो कसा निकामी
Taxonomy upgrade extras
मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत...
तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका.
( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..)
संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
१. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन.
२.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल.
३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.
'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!
मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला - 'डोंबिवली फास्ट'. चित्रपट फारच सुरेख जमलाय...मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही....फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.
सुचना/Disclaimer - Spoilers ahead!
मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !
राधा
कळलेच नाही मजला
जडला कसा जिव्हाळा
मन चिंब भिजवुनी हा
जणु कृष्णमेघ गेला
थेंबात प्रीत जागे
स्पर्शास ओढ लागे
कळले कधी न जुळले
आतुर मनांचे धागे
सर्वस्व ये फुलुनी
जणु केवडा फुलावा
हातात चांदण्यांचा
जणु ताटवा मिळावा
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
Taxonomy upgrade extras
खुन्नस
मिसळ पाव अभिरुची कट्टा
पेठकरकांचा कॅमेरा जर्रा अंमळ ऊशीराने क्लिकला त्यामुळे अगोदर काढलेले फोटो अपलोड करु शकलो नव्हतो.ते सगळे फोटो स्वाती राजेश ने खास ईग्लंडाहुन धुवुन पाठवले. मजा करण्यात पुणेकर काही मागे नाहीत हे या फोटो वरुन लक्षात येईलच.
गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख
नमस्कार मंडळी,
आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm
या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.
रॉक ऑन च्या निमित्ताने..
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे...
सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन.
आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.
मिसळपाव