Skip to main content

आस्वाद

ओंजळ (रान)फुलांची...

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 23/09/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांची फुले बघुन, आमची फुल ना (रान) फुलाची पाकळी.... १. २. ३. ४. ५.

ये कौन चित्रकार है ? ... अर्थातच किमयागार निसर्ग

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 22/09/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल ! Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात.

मैत्री...

लेखक कावळा यांनी सोमवार, 22/09/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दि
Taxonomy upgrade extras

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 21/09/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.

माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 19/09/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय सकाळी लवकर उठणार्‍या मंडळींपैकी नाही... पण त्या १९ मार्चला ग्रहण दिसणार आणि सूर्य उगवतानाच ग्रहण लागलेले असणार असे काहीसे आदल्या दिवशी वाचलेले होते... लवकर जाग आली आणि खिडकीपुढे जाऊन उभा होतो, सूर्य उगवायचा होता अजून ... आता परत झोपावे की काय अशा विचारात थोडा वेळ आकाशाकडे दुर्लक्ष झालं आणि वर बघतो तो असा तुकडा चावलेला सूर्य दिसला... मला अंदाजच नव्हता की इतका छान आणि ( शीतल..थोडा वेळ का होईना) दिसणार आहे सूर्य ... काही सेकंद डोळे भरून ते दृष्य पाहिलं आणि कॅमेरा आणायला धावलो... हा पहिला फोटो...

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 18/09/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु