Skip to main content

आस्वाद

प्रतिबिंब

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 19/08/2008 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
Taxonomy upgrade extras

एक सुवर्णयोग !!!

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 19/08/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात.... कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'ए. आय. एम. एस. टी(एम्स्ट)'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.

अजुन काही फोटोज... :)

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 14/08/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्य

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

लेखक बिनडोक बनी यांनी बुधवार, 13/08/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये आम्ही वैवाही भाबडे. तुम्हा रुचेल का हो हे माझे मोडके तंगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो बायको घरात आम्हा म्हणते फावडे. जन्म स्वैपाकात गेला, अमुचे भांड्यांशी वाकडे. जशी समजून चाले ती आम्हांसी बोकडे. जरा चालवूद्या हात, जुळवितो माझे शब्द. लव्हमॅरेज अमुची कथा अगदिच नाही निर्बुद्ध. - बिनडोक बनी प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ

पाऊस..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 11/08/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे.. पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
Taxonomy upgrade extras

मलेशियातील माझे खाद्यजीवन

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 10/08/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रु, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच.

गीता दत्त.. २० जुलै स्मरणदिन

लेखक संजय अभ्यंकर यांनी रविवार, 10/08/2008 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, २०जुलै ला गीता दत्तचा स्म्रण दिन आला आणी गेला. त्याची आपण फारशी दखल घेतली नाही. आवडती संकेतेस्थळे चाळताना एका स्थळावर तीच्या स्मरणदिना निमित्त, तीचि अनेक गाणी त्यांनी उपलब्ध केली आहेत. गीता दत्त चे एक अप्रतिम गीतः http://www.indianscreen.com/mp3/Geeta/HumBhiInsanHain_1959-GeetaDutt&Su… आणी त्यास्थळाची लिंकः http://www.indianscreen.com/Geeta.htm धन्यवाद!

अगागागागाऽऽगाऽऽऽगा!!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 08/08/2008 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नाथांच्या "विंचू चावला" वरून सुचलेले हे आम्हां बिचार्‍या......) अनाथांचे भारूड अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ अगगगगगाऽ................... सर्कू चावला! द्येवा रं द्येवाऽऽ................ सर्कू चावला!! आत्ता काय मी करू?....... सर्कू चावला!!! आनि कुनाला सांगू?....... सर्कू चावला!!!! अरं असा रं कसा!.......... सर्कू चावला!!!!!! अग बया बया बया!!..........
Taxonomy upgrade extras