सलामत हरी राया!!!
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो.
ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत.
त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात.
रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात.
कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या काळात आपापल्या गावी परतून आप्तेष्टांना भेटतात. ह्याला "बालिक काम्पुंग" असे म्हणतात.अतिशय प्रेमाने भेटवस्तूंची देवाणघेवाण होते.
दररोज संध्याकाळी "बुका पुआसा"ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.बुका पुआसा म्हणजे सूर्यास्त्तापश्चात् एकत्र येऊन सोडलेला उपवास!
रस्त्यांतून ठिकठिकाणी दिव्याची रोषणाई केली जाते.
महिनाअखेर ईद का चांद दिस्ल्यावर अईद्-इल-फित्री (रमजान ईद) साजरी केली जाते."सलामत हरी राया अईद्-इल-फित्री " असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात.
ह्या शुभदिनी स्त्रिया "बाजु कुरंग" आणि पुरुष " बाजु मेलायु" ह्या पारंपारिक पेहरावात दिसतात. पुरुष गोल काळी टोपी घालतात.लहानमोठे सर्व ह्याच वेषात वावरताना दिसतात.
येथील मुस्लिम लोक सौम्य स्वभावाचे,मनमिळावू व शांतताप्रिय आहेत.त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते मला नेहमीच जाणवते.
देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होणार्या त्यांच्या ह्या सणात त्यांनी आम्हालाही आदराने व प्रेमभावाने सहभागी करुन घेतले.बुका पुआसाचे खास आमंत्रण,आदरातिथ्य ह्या सर्व गोष्टींचे वर्णन करावे तितके थोडेच.
त्यांना मनापासून म्हणावेसे वाटते "सलामत हरी राया"!!

वाचने
6375
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
छान !
छान माहीती.
In reply to छान माहीती. by प्रमोद देव
हरी राया
In reply to हरी राया by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हरी राया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to हरी राया by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तरीही
In reply to छान माहीती. by प्रमोद देव
धन्यवाद
In reply to छान माहीती. by प्रमोद देव
बहाशा
सलमत हरी राया
सलमत हरी राया
रमझान आणि बकरी ईद.
बकरी ईद
In reply to बकरी ईद by बिपिन कार्यकर्ते
असेलही....
In reply to बकरी ईद by बिपिन कार्यकर्ते
चुकीची माहिती...
सलामत हरी राया!!!
In reply to सलामत हरी राया!!! by संजय अभ्यंकर
भाषा
मस्त वर्णन
In reply to मस्त वर्णन by ३_१४ विक्षिप्त अदिती
आभार
लेख आणि
In reply to लेख आणि by विसोबा खेचर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by स्वप्ना हसमनीस
स्वागत..
In reply to धन्यवाद by स्वप्ना हसमनीस
+१
व्वा..छान